लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. २१) एकूण १२४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १२९ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान नाशिक मनपा क्षेत्रात एकाचा मृत्यू झाला असल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २०३६ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार ३१३ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख १० हजार ९७९ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १२९८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.०८ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.६४, नाशिक ग्रामीण ९६.४१, मालेगाव शहरात ९३.४९, तर जिल्हाबाह्य ९४.७३ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ७७ हजार ७६४असून, त्यातील ३ लाख ६० हजार ३९१ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १४ हजार ३१३ रुग्ण बाधित आढळून आले असून, ३०६० रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.