शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पंचशीलनगर : कोरोनामुक्त झालेल्या रूग्णाचा आरोग्य पथकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 4:56 PM

या मारहाणीत एका पथकातील एका महिलेच्या मानेला जखम झाली आहे. या मारहाणी प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी डॉ. स्वाती सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

ठळक मुद्दे भद्रकाली पोलीसांकडून गुन्हा दाखलशहरात एकूण १६८ महिलांचे आरोग्य पथक कार्यरत

नाशिक : कोरोना संक्रमण काळात एखाद्या योद्धयाप्रमाणे आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी जनसामान्यांसाठी झटत आहे. अशाच एका 'कोरोना वॉरियर्स'च्या पथकावर जुने नाशिकमधील पंचशीलनगर भागात हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, जुन्या नाशकातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील पंचशीलनगर भागात घरोघरी सर्वेक्षण करण्यासाठी महिलांच्या एक पथकाने भेट दिली. यावेळी काही दिवसांपुर्वीच कोरोनामुक्त झालेल्या पंचशीलनगरमधील रहिवाशी संशयित सलीम तांबोळी यांच्या घरी पथकाने भेट दिली. त्यांच्यावर कोरोना आजारानंतर उपचार करण्यात आले आणि 'डिस्चार्ज' दिला गेला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची आईसुध्दा कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले. त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तांबोळी यांनी त्यांना "बाहेरून काय विचारता घरात येऊन तपासणी करा" असे सांगत उंबरठ्यावर मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या मारहाणीत एका पथकातील एका महिलेच्या मानेला जखम झाली आहे. या मारहाणी प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी डॉ. स्वाती सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भद्रकाली पोलिसांकडून केला जात आहे.शहरात एकूण १६८ महिलांचे आरोग्य पथक कार्यरत असून पथकावच हल्ला झाल्याने आरोग्यसेवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोना सारख्या महामारीत जीवाची पर्वा न करता या महिला आरोग्यसेविका 'कोरोना योद्धा' म्हणूनच काम करत आहे. मात्र अशा प्रकारे त्यांनाच काही लोकांकडून मारहाणीचा प्रयत्न होत असेल तर कोरोनाच्या संकटसमयी पुढे येणार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस