नाशिक : कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सोमवारी अवघी १४० रुग्णांची वाढ झाल्याने प्रशासनासह आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. तर दिवसभरात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या बाधितांच्या तुलनेत दुपटीहून अधिक ३०५ होती. मात्र, नाशिक शहरात एक, ग्रामीणला दोन तर जिल्हा बाह्य एक याप्रमाणे चार जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बाधितांची संख्या २१०९ वर पोहोचली आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख २२ हजार ९५० वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १७ हजार ८६० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. २९८१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.८६ वर आली आहे. त्यात नाशिक शहरात ९६.०८, नाशिक ग्रामीण ९५.९५, मालेगाव शहरात ९२.१८, तर जिल्हाबाह्य ९३.९५ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ४३ हजार ९०० असून, त्यातील चार लाख १९ हजार ५३५ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख २२ हजार ९५० रुग्ण बाधित आढळून आले असून, १४१५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.
बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 11:11 PM
नाशिक : कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सोमवारी अवघी १४० रुग्णांची वाढ झाल्याने प्रशासनासह आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. तर दिवसभरात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या बाधितांच्या तुलनेत दुपटीहून अधिक ३०५ होती. मात्र, नाशिक शहरात एक, ग्रामीणला दोन तर जिल्हा बाह्य एक याप्रमाणे चार जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बाधितांची संख्या २१०९ वर पोहोचली आहे.
ठळक मुद्देआतापर्यंतच्या बाधितांची संख्या २१०९ वर पोहोचली आहे.