नाशिक : शहरात गुरुवारी (दि. २) ६३ रुग्ण आणि ग्रामीण भागात तसेच जिल्हाबाह्य मिळून ६८ रुग्णांची नवीन भर पडली. त्यामुळे बाधितांची संख्या ४ हजार ५८४वर पोहोचली असून, मृतांच्या संख्येत नऊची भर पडल्याने एकूण मृतांचा आकडा २४९ झाला आहे.गुरुवारी शहरातील बाधितांचा आकडा ६३ वर पोहोचल्याने बाधितांच्या संख्येने साडेचार हजारांचा टप्पा ओलांडला. नाशिक महानगराच्या हद्दीत सहा रुग्णांचा मृत्यू झाला. जुने नाशिक, सिडको आणि पंचवटी या भागांतील नागरिक असून, त्यात एका महिलेचा समावेश आहे, तर ग्रामीण भागातील तिन्ही मृत्यू हे नांदगाव तालुक्यातील आहेत.पाच अधिकाऱ्यांची सेवा मनपाकडे !शहरात वाढत चाललेला संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासन चर्चेतून निर्णय घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या माध्यमातून नाशिक महापालिकेस यापूर्वी ५० लाखांचा निधी देण्यात आला असून, आज पुन्हा एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याशिवाय कोरोना प्रतिबंधक उपायांची क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनातील पाच अधिकाऱ्यांची सेवा महानगरपालिकेस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात महापालिकेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदनकुमार सोनवणे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, नितीन गावंडे, भूसंपादन उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, कार्यकारी अभियंता प्रवीण खेडकर, जिल्हा नियोजन अधिकारी हेमंत अहिरे यांचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्णातील मृतांची संख्या २४९ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. महानगरात जून महिन्याच्या उत्तरार्धापासून बाधितांचे मृत्यू होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे महापालिका आरोग्य प्रशासनाच्या दृष्टीने ही अत्यंत चिंतेची बाब ठरत आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाने घेतले ९ जणांचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 12:46 AM