नाशिक : येथील त्र्यंबकेश्वर रोडवरील महाराष्ट्र पोलीस ॲकेडमीमध्ये तब्बल १६७ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील आठ दिवसांत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून एकूण ८९४ संशयितांची कोविड-१९ची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी आतापर्यंत १६७ प्रशिक्षणार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यामधील सुमारे १२७ रुग्णांवर ठक्कर डोम येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.शहरासह जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत असला तरीदेखील शहरासह ग्रामीण भागात दररोज शंभरापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे सत्र सुरुच आहे. कोरोना प्रादूर्भावाचा धोका अद्यापही टळलेला नाही. दरम्यान, ललॉकडाऊनपासून पोलीस ॲकडेमीमधून प्रशिक्षणार्थी उमेदवारांपासून स्वयंपाकीसह चतुर्थश्रेणीतील सर्व कर्मचारी वर्गाला मुख्य उंबरठा ओलांडण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. विविध कारणास्तव बाहेरुन येणाऱ्या वाहनांना ॲकेडमीच्या प्रवेशद्वारावरच निर्जंतुक करुन प्रवेश दिला जात आहे. तसेच अधिकारी वर्गांचे तपमान व ऑक्सिजनपातळी मोजूनच प्रवेश दिला जात आहे. मात्र प्रशिक्षणार्थी उपनिरिक्षकांना तसेच चतुर्थश्रेणीतील सर्व कर्मचाऱ्यांना ॲकेडमीच्या आवारातून बाहेर जाण्यास पुर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वोतोपरी ॲकेडमीच्या प्रशासनाकडून खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असल्या तरीदेखील कोरोनाने ॲकेडमीमध्ये शिरकाव केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.आठवडाभरापासून पोलीस ॲकेडमीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. यानंतर प्रशासन जागचे हलले आणि कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी अधिक कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत तब्बल १६७ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षकांना कोरानोची लागण झाल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. १२७ कोरोनाबाधितांवर ठक्कर डोम येथील कोविडसेंटरमध्ये तर उर्वरित काहींना मविप्रच्या डॅ. वसंत पवार रुग्णालयात तर काहींना शहरातील अन्य खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत ॲकेडमीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही.
महाराष्ट्र पोलीस ॲकेडमीमध्ये कोरोनाचा शिरकाव; १६७ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 3:45 PM
प्रशिक्षणार्थी उपनिरिक्षकांना तसेच चतुर्थश्रेणीतील सर्व कर्मचाऱ्यांना ॲकेडमीच्या आवारातून बाहेर जाण्यास पुर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वोतोपरी ॲकेडमीच्या प्रशासनाकडून खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असल्या तरीदेखील कोरोनाने ॲकेडमीमध्ये शिरकाव केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ठळक मुद्दे८९४ संशयितांच्या तपासण्या १२७ रुग्णांवर ठक्कर डोम येथील कोविड सेंटरमध्ये उपचारप्रशिक्षण कालावधी लांबणार