साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा गावांतील एक व्यक्ती दोन महिन्यांपूर्वी नासिकला कोरोनाबाधित झाली होती.त्यामुळे संबंधीत व्यक्तीला त्वरित उपचार मिळाल्याने ती ठणठणीत झाली मात्र आता गावांतील एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याने तसेच दुसर्या चौकातील पुन्हा एक असे एकुण सात रुग्ण सापडल्याने गाव स्वयंस्फुर्तीने तीन दिवस बंद ठेवण्यात आले आहे.कोरोनाच्या पाश्वर्भुमीवर परिसरात कोरोणाची लागण होऊ नये, म्हणून ग्रामपंचायत प्रशासनामार्फत दोन महिन्यांपूर्वीच पैसा खर्च करण्यात आला मात्र आता गावातील एकाच कुटुंबातील सहा जण आणि दुसर्या कुटूंबातील एक असे एकुण सात जणांना कोरोनाची लागण झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले असून दोन चौकात १००-१०० मिटरचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.तसेच एकुण २१ जणांना १४ दिवस होमकॉरंटाईन करण्यात आले आहे.तसेच ग्रा.प.प्रशानाच्या वतीने या दोन्ही क्षेत्रातील नागरिकांना सॅनिटाईझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले असून,फवारणीचे काम जोरात सुरू करण्यात आले असून, सतकर्तेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आरोग्य विभागाकडून सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, आशा च्या वतीने गावात सर्वे सुरू केला आहे.प्रतिबंधित क्षेत्रातील ३०वर्षापुढिल व्यक्ती आणि ७वर्षाखालील लहान मुलांना काही त्रास जाणवल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील सर्व व्यावसायिकांनी स्वयंस्फुर्तीने तीन दिवस गाव बंद ठेवले आहे.