नाशिक : शहरात आणखी पाच कोरोनाबाधित आढळले असून, त्यामुळे महापालिका हद्दीतील बाधितांची संख्या ६७ झाली आहे. गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मिळालेल्या अहवालानुसार तेवीस पॉझिटिव्ह बाधित शहरातील असल्याने खळबळ उडाली आहे. तथापि, बारा बाधितांपैकी सात जण हे शहराबाहेरील आहेत, तर पाच जण शहरातील असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. शुक्रवारी सापडलेले अकराही जण शहरातील असल्याने २४ तासांत बाधितांची संख्या सोळा झाली आहे. त्याची दखल घेत तातडीने घर सर्वेक्षण मोहीम राबविण्यास प्रारंभ झाला असून, बाधितांच्या संपर्कातील सुमारे ७५ जणांचे घसा स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.गुरुवारी दुपारपर्यंत वडाळा येथील एका बाधितांच्या संपर्कातील दोघांना लागण झाली होती, तर एका सातपूर-अंबड लिंकरोडवरील एका वृद्धाला संसर्ग झाला असला तरी १९ मे रोजीच त्याचा मृत्यू झाला होता. तथापि, त्यानंतर महापालिकेने या भागात तातडीने संपर्कातील व्यक्तींची तपासणी सुरू केली होती आणि वीस जणांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तथापि, गुरुवारी (दि.२१) रात्री ११ वाजता शहरातील बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील चार रुग्ण हे मुंबईतील रहिवासी आहेत. ते आणि त्यांचे नातेवाईक असे सात जण बाहेरील असून, पाच जण शहरातील आहेत. यात संजीवनगर येथील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वृद्धाच्या संपर्कातील दोन व्यक्ती बाधित असल्याचा अहवाल आला आहे. आता त्यांच्या संपर्कातील ५३ जणांचे नुमने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.नासर्डी नदीलगतच्या शिवाजी वाडी येथे एका किराणा दुकानदाराला श्वसनाचा त्रास होत असल्याने बुधवारी (दि.२०) जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्याच्या संपर्कातील १२ जणांचे नमुने तपासणी पाठविण्यात आले आहेत. शहरातील मोठा राजवाडा येथील रहिवासी असलेल्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यास श्वसनाचा त्रास तसेच व सर्दी ताप होत असल्याने बुधवारी (दि.२०) त्यास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नाईकवाडी पुरा येथील रहिवाशी येथील महिला यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यांचे स्वॅब घेण्यात आले ते पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्या संपकार्तील दहा जणांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत.---------बाहेरील सात रुग्ण, पैकी दोघांचे अगोदरच मृत्यूनाशिक शहरातील १२ बाधितांचे अहवाल गुरुवारी (दि.२१) रात्री पॉझिटिव्ह आले असले तरी त्यातील चार जण मुंबईचे आहेत. ते मुंबईहून देवळा येथे आले होते. त्यांच्या घरातील महिलेला सर्दी खोकल्याचा त्रास झाला म्हणून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या संपर्कातील पाच संशयितांना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांचे घसा स्त्रोत नमुने घेतले असता त्यांच्यातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.मुंबई येथून एक वृध्द नाशिकमध्ये आल्यानंतर १६ मे रोजी त्यांना हृदयाचा त्रास होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील तीन जणांना तपोवन येथील कोरोना कक्षात दाखल करून घेण्यात आले त्यापैकी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत हे पंचवटी परिसरातील रहिवासी आहेत. तसेच यापूर्वी संगमेनर येथील निमोण येथून नाशिकमध्ये आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेला एक व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत.
शहर परिसरात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 10:12 PM