नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तीन दिवसीय कोरोना तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. पहिल्या दिवशी येथील परिसरातील ५८ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या काही दिवसांत कोरोना रु ग्णांची संख्या अधिक असल्याने दापूर प्राथमिक आरोग्य केंद्र व नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (दि.५) पासून ग्रामीणस्तरावरील जिल्ह्यातील पहिले स्वॅब संकलन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.पंचायत समितीच्या सभापती शोभा बर्केयांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे स्वॅब संकलन केंद्र सुरू झाले आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोलीत स्वॅब घेण्यात आले. पहिल्या कोरोना बाधित रु ग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, तर काही नागरिकांना लक्षणे आढळून येत असल्याने त्यांनी स्वत: हून तपासणी करून घेतली.सकाळी नाव नोंदणी झाल्यानंतर दीड वाजेपर्यंत ५८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी मोहन बच्छाव, दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के, डॉ. लहू पाटील, प्रणाली दिघे, अनिल गांगुर्डे, एस. एस. कापरे आदींसह इंडिया बुल्स येथील आरोग्यसेविका आदीच्या पथकाने कोरोना तपासणी केली. वैद्यकीय अधिकारी नितीन म्हस्के यांनी कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी याविषयी नागरिकांना मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच गोपाल शेळके, दीपक बर्के, नानासाहेब शेळके, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती शेळके, रामदास सानप, अनिल शेळके, शशिकांत येरेकर, ग्रामविकास अधिकारी एस. डी. आहिरे आदींसह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
नांदूरशिंगोटेत कोरोना तपासणी शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 2:47 PM
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तीन दिवसीय कोरोना तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. पहिल्या दिवशी येथील परिसरातील ५८ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
ठळक मुद्दे५८ जणांचे स्वॅब : ग्रामपंचायत, आरोग्य विभागाचा पुढाकार