नाशिक : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. रविवारी (दि.५) कोरोनामुळे आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोनाबळींची संख्या तब्बल २७७वर पोहोचली. बाधितांच्या संख्येत देखील २७९ रुग्णांची भर पडल्याने प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.जिल्ह्यात रविवारी कोरोनामुळे मृत झालेल्या सात जणांमध्ये पाच नागरिक नाशिक मनपा हद्दीतील तर दोन जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहेत. एक बाधित सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील तर दुसरा बाधित मनमाडचा रहिवासी आहे. नाशिक शहरातील पाचही बाधित हे शहराच्या विविध विभागांतील रहिवासी आहेत. जिल्ह्णातील बाधितांच्या संख्येत रविवारी २७९ रुग्णांची भर पडल्याने बाधित रूग्ण संख्या ५३९१ वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यात रविवारी नवीन ६६२ रुग्ण दाखल झाले असून, यापूर्वीच्या ६२९ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.जिल्ह्णात कोरोनाची बाधा झाल्यापासून तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला असून, जिल्ह्णातील १५ तालुक्यांपैकी १४ तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एकमेव सुरगाणा तालुका अद्यापही कोरोनामुक्त असून, निदान हा तालुका तरी कायमस्वरूपी कोरोनामुक्त रहावा, यादृष्टीने जिल्हा प्रशासनाचे प्रयास सुरू आहेत. जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्णातील चार तालुके कोरोनामुक्त होते. मात्र, जुलै महिन्याच्या प्रारंभापर्यंत केवळ पेठ आणि सुरगाणा हे दोनच तालुके कोरोनामुक्त राहिले. २ जुलैला पेठमध्येदेखील दोन कोरोनाबाधित आढळण्यासह दोघांचा मृत्यू झाल्याने आता केवळ सुरगाणा तालुका कोरोनामुक्त उरला आहे. रविवारपर्यंत (दि.५) जिल्ह्णातील एकूण बाधितांची संख्या ५,३९१ वर पोहोचली असून, सध्याच्या स्थितीत जिल्ह्णात २,४०९ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २७७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाने घेतले सात जणांचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 12:33 AM
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. रविवारी (दि.५) कोरोनामुळे आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोनाबळींची संख्या तब्बल २७७वर पोहोचली. बाधितांच्या संख्येत देखील २७९ रुग्णांची भर पडल्याने प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
ठळक मुद्देसंसर्गाचा धोका कायम : रविवारी बाधितांच्या संख्येत झाली २७९ने वाढ