नाशिक : महानगरातील सहा आणि ग्रामीण भागातील दोन मृत्युमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या तब्बल ३४९ वर पोहोचल्याने चिंता कायम आहे. शहरात बाधितांच्या संख्येत मंगळवारी (दि. १४) १८५ भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ७,४४४ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. चाचण्यांची संख्या वाढवूनदेखील मंगळवारी सुदैवाने नवीन संशयित आणि बाधितांच्या संख्येत नेहमीच्या तुलनेत काहीशी कमीची भर पडल्याने यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला.जिल्ह्याच्या दोन मृतांपैकी एक नांदूरगावचा रहिवासी, तर एक नागरिक सटाण्यातील मुल्हेर येथील रहिवासी आहे.मंगळवारी महानगरात १३६, ग्रामीण भागात मिळून ४९ असे १८५ नागरिक बाधित आढळले आहेत. मंगळवारी दाखल झालेल्या ६५८ संशयितांमध्ये ३३६ बाधित हे नाशिक मनपा हद्दीतील, २५७ नाशिक ग्रामीण हद्दीतील, जिल्हा रुग्णालय १५, डॉ. पवार मेडिकल कॉलेज ९, मालेगाव मनपा १५, तर गृहविलगीकरणातील २६ जणांचा समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी पुन्हा एकदा प्रलंबित अहवालांची संख्या तब्बल ८९९ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाने घेतला आठ जणांचा बळीसंकट कायम : बळींची एकूण संख्या ३४९ वर; दिवसभरात आढळले नवीन १८५ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 1:25 AM