नाशिक : कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागताच गावाकडे परतलेले हजारो कामगार पुन्हा आपापल्या कामाच्या शहरांकडे परतले आहेत. कोरोनाचा बहर ओसरल्याने आलेले बहुतांश कामगार पुन्हा आपापल्या कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये आता अधिकांश ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे.
गतवर्षी कोरोनाच्या प्रारंभावेळीच जिल्ह्यातील आपापल्या गावांकडे परतलेले कामगार हे पुन्हा कामावर परतायला सहा महिन्यांचा कालावधी लागला होता. गतवर्षी मार्च ते एप्रिलमध्ये घराकडे परतलेले कामगार पुन्हा कामावर रुजू होण्यास नोव्हेंबर महिना उजाडला होता. त्यानंतर पुन्हा दुसरी लाट मार्चमध्ये सुरू झाल्यानंतर कामगार घराकडे परतू लागले होते. तर काही जणांनी त्यांच्या राहत्या शहरात उपचार मिळत नसल्याने किंवा ते परवडत नसल्याने जिल्ह्यातील आपापल्या गावांना परतण्यास सुरुवात केली होती. ही लाट जूनमध्ये कमी झाल्यानंतर निम्मे कामगार जूनमध्ये तर निम्मे कामगार जुलैच्या प्रारंभीच आपापल्या कामकाजाच्या शहरात रवाना झाले आहेत.
-----
सर्वाधिक स्थलांतर मुंबईकडे
मुंबई - ७९६५
पुणे - ५१८६
ठाणे - ४२७५
औरंगाबाद- २८३४
-----
शिक्षणासाठी मुले विदेशात असणाऱ्यांना घोर
ज्या पालकांची मुले शिक्षणासाठी विदेशात आहेत, त्या पालकांच्या चिंतेला तर अजिबात अंतच नाही, अशी परिस्थिती आहे. दररोज मुलगा किंवा मुलीला फोन करून त्याची ख्यालीखुशाली विचारणे, कोणताही आजार, त्रास नाही ना त्याची खातरजमा करून काळजी घेण्यास सांगणे इतकेच पालकांच्या हाती उरले आहे.
------------
कन्या फ्रान्समध्ये असल्याने चिंता
माझी कन्या तीन वर्षांच्या शिक्षणासाठी फ्रान्सला गेली. त्यातील दीड वर्ष या कोरोनातच गेले असून विदेशात तिला ताप जरी आला तरी इथून काहीच करता येत नाही. त्यामुळे विदेशात पाल्य असलेल्या पालकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- वसंत शेगोकार, पालक
----
मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेत
मुलगा दोन वर्षांपूर्वीच शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. कोरोनाच्या प्रकोपामुळे त्याला परत यायलादेखील जमलेले नाही. आम्ही केवळ व्हिडीओ कॉल करून त्याची विचारपूस करू शकतो. कोरोनामुळे सर्वच पालकांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.
विनय जमदाडे, पालक
-----
ही डमी आहे.