नाशिकरोड : कोरोना विरोधातील लढाईला बळ देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व प्रशासन प्रमुखांनी कोरोना प्रतिबंधक लस घेऊन सर्व आरोग्य कर्मचारी, अन्य शासकीय कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांनादेखील भविष्यात लस घेण्याची प्रेरणा दिली.
गत २० दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास देशात सर्वत्र सुरुवात करण्यात आली असून लसबाबत शंका-कुशंका निर्माण होऊ नये व नागरिक, महिला, शासकीय, अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये विश्वास निर्माण व्हावा, म्हणून बिटको कोरोना कोव्हीड सेंटर मध्ये शासकीय विविध विभागाच्या प्रमुखांनी शुक्रवारी सायंकाळी कोरोना प्रतिबंधित लस घेतली. त्यात जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचा समावेश होता. या सर्व अधिकाऱ्यांनी लसीकरणाव्दारे सर्वांनी लस घेण्यास अजिबात संदेह करु नये, असाच संदेश त्यांनी दिला. शुक्रवारी सायंकाळी बिटको कोरोना सेंटरमध्ये प्रारंभी तापमानाची तपासणी करून नावाची नोंद करण्यात घेतली. त्यानंतर कोरोना प्रतिबंधित लस टोचून घेतली. त्यानंतर अर्धा तास निरीक्षण कक्षात थांबवून त्यांचे निरीक्षण करण्यात आले. कोव्हीड सेंटरप्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी लस घेतल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
===Photopath===
050221\05nsk_54_05022021_13.jpg
===Caption===
कोविशील्ड लस घेतल्यानंतर ती सुरक्षीत असल्याचे सांगणारे अधिकारी पोलीस आयुक्त दीपक पांडेय, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयक्त कैलास जाधव व जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड.