नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्येही लक्षणेच नसलेल्यांचे प्रमाण ७५ टक्के इतके आहे, तर नाशिक जिल्ह्याचा मृत्युदर पूर्वी साडेपाच टक्के होता तो आता अत्यंत कमी झाला आहे.राज्यात मृत्युदराच्या क्रमवारीत नाशिकचा चोवीसावा आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली. नाशिक जिल्ह्यात विशेषत: शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, दररोज आठ ते दहा जणांचे बळी जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले की, रुग्णसंख्या वाढत असली तरी उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यातही प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण ७५ टक्के इतके आहे. उरलेल्या २५ टक्के रुग्णांमध्येसुद्धा गंभीर लक्षणे असलेल्यांचे प्रमाण दहा टक्क्यांच्या आतच आहे.खरी चिंता मृत्युदराची असते. नाशिक जिल्ह्यात कोरोनाबळींचा दर कमी होत चालला आहे. यापूर्वी जिल्ह्याचा मृत्युदर साडेपाच टक्के होता तो आाता दोन टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. राज्यात नाशिकचा क्रमांक चोविसावा आहे, म्हणजेच तेवीस जिल्ह्याचा दर जास्त असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी (दि.३०) सकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यात मार्चपासून आत्तापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ३५ हजार ३२० असली तरी प्रत्यक्षात ६ हजार ४८६ रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. तर २७हजार ९७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७९.२१ टक्के इतके आहे.शहरात एका रुग्णाचा मृत्यूनाशिक शहरात गेल्या चोवीस तासात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. तर ७९७ नवे रुग्ण आढळले आहेत. रविवारी (दि.३०) सिडकोतील कामटवाडे शिवारातील एका ७८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. शहरात आढळलेल्या ७९७ रुग्णांमुळे एप्रिलपासून आत्तापर्यंत बाधितांची एकूण संख्या २४ हजार ८०५ झाली आहे. मात्र २० हजार १३५ रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयात सद्य:स्थितीत ४ हजार १८४ रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोना मृत्युदरात नाशिक राज्यात चोवीसाव्या स्थानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 1:53 AM
शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्येही लक्षणेच नसलेल्यांचे प्रमाण ७५ टक्के इतके आहे, तर नाशिक जिल्ह्याचा मृत्युदर पूर्वी साडेपाच टक्के होता तो आता अत्यंत कमी झाला आहे.
ठळक मुद्देमोठी घट : लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण ७५ टक्के