नाशिक जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असून, आदिवासी भागात लग्नाबाबत अजूनही जुन्याच रूढी, परंपरा कायम आहेत. त्यामुळे लग्नाविषयी करण्यात आलेले कायदे लागू होत नाही; परंतु कोरोना महामारीमुळे आदिवासींमध्ये देखील लग्न संख्या घटली, त्यामुळे जन्मदरावर त्याचा परिणाम झाला आहे. संपूर्ण वर्षभर कोरोनाचा प्रभाव कायम राहिल्याने जिल्ह्यात मृत्यूदरातही मोठी वाढ झाली असून, तो कमी करण्यासाठी आरोग्य विभाग हरतऱ्हेचे प्रयत्न करीत आहे.
---------------
जन्मदरात झाली घसरण
वर्षभर कोरोनाचा प्रभाव कायम राहिल्यामुळे व त्यातल्या त्यात आरोग्याबाबत समाज चांगलाच सजग झाला आहे. गरोदर महिलांना कोरोना प्रादुर्भाव लवकर होतो, असा समज झाल्याने लग्न झाले तरी गर्भधारणा लांबविण्याकडे नवजोडप्यांचा कल राहिल्याचा परिणामही जन्मदरातील घट होण्यात झाला आहे.
----------
वर्ष- २०१९- जन्म- १०२०९८- मृत्यू-२६९८९
२०२०- जन्म- ९९६९०- मृत्यू- ३१७४१
--------------
लग्नसंख्येत मोठी घट
गेल्या वर्षभरात विवाह सोहळ्यांची संख्या कमी झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होताच, मार्च ते जून महिन्यापर्यंत देशात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर मात्र लग्नाचा मुहूर्त नसल्याने लग्नसोहळे थांबविण्यात आले. दिवाळीनंतर लग्नसोहळ्यांचा बार उडण्याची चिन्हे दिसू लागताच चालू वर्षी मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले परिणामी गर्दीवर बंधने आल्याने सर्व विवाह सोहळे रद्द करण्यात आले.