शनिवारी सायंकाळी झिरवाळ यांनी पेठ तालुका दौरा केला. प्रथम ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. नंतर तहसील कार्यालयात बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार संदीप भोसले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, गिरीश गावित, करण करवंदे आदी उपस्थित होते.
झिरवाळ यांनी पेठच्या लसीकरण केंद्रास अधिकाऱ्यांसमवेत भेट दिली असता लससाठा शिल्लक असूनही नागरिकांचा प्रतिसाद नसल्याचे दिसून आले. यावर लोकप्रतिनिधींसह सामाजिक संस्थांनी नागरिकांचे प्रबोधन करून लसीकरण करून घेण्याबाबत गावागावात जनजागृती मोहीम राबविण्याचे आवाहन केले.
फोटो - २५ पेठ १
पेठ येथे आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना नरहरी झिरवाळ. समवेत भास्कर गावित, डॉ. संदीप आहेर, संदीप भोसले आदी.
===Photopath===
250421\25nsk_34_25042021_13.jpg
===Caption===
पेठ येथे आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना नरहरी झिरवाळ. समवेत भास्कर गावित , डॉ. संदिप आहेर, संदिप भोसले आदी.