नाशिक : चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायरस हा चिकनमुळे पसरत असल्याच्या अफवेचा फटका कोंबडी खाद्य असलेल्या मक्यालाही बसला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मक्याचे दर घसरले आहेत. यावर्षी झालेला चांगला पाऊस आणि लष्करी अळीवर शेतकऱ्यांनी केलेली मात यामुळे मका उत्पादनाविषयीचे कृषितज्ज्ञांचे आणि व्यापाºयांचेही अंदाज चुकले आहेत.याशिवाय यावर्षी पाण्याच्या उपलब्धतेमुळे अनेक शेतकºयांनी रब्बी मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली असल्याने त्या पिकाच्या भरवशावर व्यापाºयांनी मका खरेदीत हात आखडता घेतला आहे. त्याचा मका उत्पादक शेतकºयांना चांगलाच फटका बसला आहे.राज्यभरातील एकूण मका उत्पादनापैकी ७० टक्के उत्पादनापासून कोंबडी खाद्य तयार केले जाते. उर्वरित ३० टक्के मालातून इतर उत्पादने बनविली जातात. यामुळे पोल्ट्री कंपन्या आणि पोल्ट्री व्यावसायिक मक्याचे सर्वांत मोठे ग्राहक आहेत, मात्र चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायरसविषयी समाज माध्यमांवरून अनेक अफवा पसरल्या. कोंबड्यांमधून कोरोनाचे विषाणू पसरतात अशी जोरदार अफवा पसरल्यामुळे चिकनचे दर कोसळले. यामुळे या कंपन्यांकडून होणारी मक्याची मागणी थांबली आहे. पर्यायाने मक्याचे दर घसरू लागले आहेत. लासलगाव बाजारात १७०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे असलेले दर एकदम १४०० रुपयांवर आले आहेत. शुक्रवारी लासलगावी मका कमीत कमी १४५२ जास्तीत जास्त १७०२, तर सरासरी १४९० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला.यावर्षी मकावर आलेल्या लष्करी अळीमुळे आणि ऐन काढणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे मका उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट येईल असा कृषी तज्ज्ञांचा आणि व्यापाºयांचा अंदाज होता, मात्र शेतकºयांनी मोठ्या कष्टाने लष्करी अळीवर मात करीत मका उत्पादन घेतले. याशिवाय यावर्षी पाण्याची उपलब्धता असल्यामुळे अनेक शेतकºयांनी रब्बी मक्याची लागवड केली आहे. याशिवाय जिल्ह्यातील अद्याप ३० ते ३५ टक्के शेतकºयांकडे खरीप मका शिल्लक आहे. यामुळे मका उत्पादनाबाबत व्यापाºयांचा अंदाज चुकला आहे.
कोरोनाच्या अफवेमुळे कोंबडीखाद्य मक्यालाही फटका
By संजय डुंबले | Published: February 15, 2020 12:43 AM
चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायरस हा चिकनमुळे पसरत असल्याच्या अफवेचा फटका कोंबडी खाद्य असलेल्या मक्यालाही बसला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मक्याचे दर घसरले आहेत. यावर्षी झालेला चांगला पाऊस आणि लष्करी अळीवर शेतकऱ्यांनी केलेली मात यामुळे मका उत्पादनाविषयीचे कृषितज्ज्ञांचे आणि व्यापाºयांचेही अंदाज चुकले आहेत.
ठळक मुद्देदर कोसळले : कृषितज्ज्ञांसह व्यापाऱ्यांचाही अंदाज चुकला