तुकाराम रोकडेदेवगांव : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने संचारबंदीमध्ये शिथिलता करण्यात आली. हळूहळू सर्व पूर्वपदावर येत असतांना कोरोनाचा मंदावलेला वेग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. सर्वसामान्यांनी खबरदारी घ्यावी व पुन्हा लॉकडाऊन होऊ नये यासाठी नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर म्हणी व उखाण्यांच्या माध्यमातून खबरदारी घेण्यासाठी जनतेस मास्क व सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन केले जात आहे.कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय बुडाले, रोजगार गेले तर काहींना नोकरी गमवावी लागली. अशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काळजी घेतली पाहिजे व टाळेबंदी होऊ नये यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळ्या म्हणी व उखाण्यांद्वारे जनजागृती केली जात आहे. यामध्ये, सावधान...ह्यतोह्ण परत आलाय, सुरक्षित अंतर, भीती छू मंतर, शिस्त पाळा, लॉकडाऊन टाळा, काळजी घ्या, सुरक्षित रहा ... नेटकऱ्यांनी कोरोना आणि मृत्यूबाई यांच्या लग्नाचं आमंत्रण सोशल मीडियावर व्हायरल केले असून यामध्ये जो सापडेल त्याला मृत्यूला सामोरे जावे लागेल. तसेच ह्यअ मास्क इज बेटर दॅन व्हेंटिलेटरह्ण, ह्यहोम इज बेटर दॅन आय सी यूह्ण, ह्यप्रिव्हेन्शन इज बेटर दॅन ट्रीटमेंटह्ण, ह्यइट्स नॉट कर्फ्यू इट्स केअर फॉर यूह्ण अशाप्रकारच्या मराठी तसेच इंग्रजी म्हणी व सुविचारांचा वापर करून ते व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसत आहेत.लॉकडाऊनच्या कडक निर्बंधात भेदरलेल्या सामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले. त्यातच आता बेफिकीर नागरिकांमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जसजसा वाढत आहेत तसतसे सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुन्हा लॉकडाऊन नको या भितीने ह्यगड्या, आपण आपलीच काळजी घ्यायला हवीह्ण अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेतून येत आहे.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले उखाणे...
हंड्यावर हंडे सात, त्यावर मांडली परात,कोरोनाला हरवायला, बसा आपापल्या घरात.मंगळसूत्राच्या २ वाट्या सासर आणि माहेर,सगळ्यांनी मास्क घालूनच पडा घराबाहेर.शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान ठेवते वाकून,रोजचे व्यवहार करा सोशल डिस्टन्सिंग राखून.शिरा बनवायला तूप, साखर, वेलची व रवा आणला जाडा,रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला प्या आयुर्वेदिक काढा.ताजमहल, कुतुबमिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट,लक्षणे दिसली कोरोनाची तर डॉक्टरांना भेटा थेट.काळे मणी, सोनेरी मणी घरभर पसरले,कोरोनामुळे सगळे ईतर आजार विसरले.चिमणीला म्हणतात चिऊ, कावळ्याला म्हणतात काऊ,आपण घरीच सुरक्षित राहू, विनाकारण बाहेर नका जाऊ.चांदीच्या ताटात ठेवले सफरचंदाचे काप,डॉक्टरांना त्वरित भेटा आला जरी ताप.