शैलेश कर्पे ।सिन्नर : आंतरराष्टÑीय ख्यातीचे देवस्थान असलेल्या शिर्डी येथील रामनवमी उत्साहावर यंदा कोरोनाचे सावट आहे. मुंबईसह उपनगरातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिर्डीकडे येणाºया शेकडो पालख्या व पायी दिंड्या निघणार नसल्याने त्याचा परिणाम महामार्गावरील व्यवसायांवरही होणार आहे. दरम्यान, शिर्डी येथील साईमंदिर दर्शनासाठी बंद असल्याने सिन्नर-शिर्डी महामार्गावर शुकशुकाट आहे.शिर्डी येथे वर्षभरात मोजके उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यात रामनवमी उत्सव सर्वात मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा केला जातो. या उत्सवासाठी मुंबईसह उपनगरातून शेकडो पालख्या व पायी साईभक्त येत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साई मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतून निघणाºया पायी दिंड्या त्यामुळे निघणार नाही. शिर्डी संस्थानेही पायी दिंडी आयोजकांना कोरोनाबाबत काळजी घेण्याचे कळविल्याने अनेकांनी पायी दिंड्यातील गर्दी टाळण्यासाठी सामाजिक भावनेतून दिंड्या न काढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.गुजरात राज्यासह मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, दादर, वसई, बोरवली, कसारा, इगतपुरी,नाशिक येथून हजारो साईभक्तपायी दिंड्यांद्वारे शिर्डीला येत असतात.अनेक दिंड्यांमध्ये हजारो साईभक्त असतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी हजारो साईभक्त एकत्र येऊ नये यासाठी पायी दिंड्या न काढण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला आहे. त्यामुळे यंदाशिर्डी मार्गावर पायी साईभक्तांचा येणारा महापूर ओसणार असल्याचे दिसते.दिंडीत असतात सहा हजारांपेक्षा जास्त साईभक्तदादर येथील साईसेवक या पायी दिंडीत दरवर्षी ६ ते १० हजार भाविक पायी दिंडीद्वारे शिर्डीला येत असतात. या दिंडीचे रौप्यमहोत्सवी वर्ष झाले असून, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पायी दिंडीवर सावट ओढावले आहे. त्यामुळे सुमारे ३० वर्षांपासून येणाºया या दिंडीत खंड पडण्याची शक्यता आहे.दिंड्या रद्द झाल्याची माहिती अन्नदात्यांनाशिर्डी येथे पायी दिंड्याद्वारे येणाºया साईभक्तांना गावोगावी मुक्काच्या ठिकाणी काही अन्नदात्याकडून भोजनाची व्यवस्था करण्यात येते. मात्र यावर्षी पायी दिंड्या येणार नसल्याचे दिंडी आयोजकांनी वावी व अन्य गावातील आयोजकांना फोनद्वारे कळविण्यात आले आहे.
साईभक्तांच्या ‘रामनवमी’वर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 9:42 PM