त्र्यंबकेश्वर : श्रावण महिना सुरू झाला की, त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून जायची. त्यातही श्रावणी सोमवारी तर भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी व्हायचीे. यंदा मात्र कोरोनाने भाविकांची वाट रोखली असल्याने त्र्यंबकनगरी ओस पडली आहे.कोरोनामुळे देवस्थान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांचा फटका त्र्यंबकनगरीला बसला आहे. गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे त्र्यंबकनगरी येथील सर्वच मंदिरे बंद आहेत. त्यामुळे गावात अक्षरश: मोठ्या प्रमाणावर शुकशुकाट दिसून येत आहे. संत निवृत्तीनाथांचे दर्शन आणि ब्रह्मगिरीची फेरीही टळल्याने भाविक निराश झाले आहेत.श्रावण महिन्याच्या पार्श्वभुमीवर त्र्यंबकनगरी सजविण्यात येत असे. येथील मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात येत असे. श्रावणी सोमवारच्या पार्श्वभुमीवर भाविकांची येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असे. इतकेच नव्हे तर श्रावणी सोमवारच्या दोन दिवस आधीच केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वर येथे येत दर्शनाचा, पुजेचा लाभ घेत असत. प्रशासकीय पातळीवरही विविध प्रकारचे नियोजन करण्यात येत असे. राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेसचीही व्यवस्था करण्यात येत असे. यंदा मात्र हे चित्र कोरोनामुळे पुसले गेले आहे. श्रावणी सोमवारच नव्हे तर एरविही नित्य पुजा सुरू असते. मंदीराचे दरवाजे बंद केल्यानंतर पुजा पार पडते. तिन्ही पुजेला हाच नियम लागु आहे. श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर नेहमी गर्दी असायची. पुजा होईपर्यंत भाविक थांबत. आता मात्र कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासुन मंदिर बंदच आहे. मात्र आमच्या तिन्ही त्रिकाल पुजेत खंड पडलेला नाही. कोरोनासंदर्भातील नियम पाळत पुजा सुरू आहे. यंदा श्रावण महिन्यातील मंदिरात होणारी गर्दी दिसत नाही, याची मनस्वी खंत वाटते. - मकरंदशास्त्री तेलंग, सायंकाळचे पुजकदर श्रावणी सोमवारच्या पार्श्वभुमीवर भाविकांची शनिवारपासुनच गर्दी होत असते. अनेक भाविक हॉटेल, लॉज तसेच पुरोहिताच्या निवासस्थानी मुक्कामी असतात.श्रावणात त्र्यंबकेश्वर शहरासह मंदीर परिसर गजबजलेला असतो. पण कोरोनामुळे मंदीरे बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने परिसर ओस पडला आहे.- गिरीष जोशी,त्र्यंबक देवस्थान ट्रस्टश्रावण महिना जणू व्यावसायीकासाठीपर्वणीच असते. कोरोना संकटामुळे भक्तांसह व्यावसायिकांनाही आहे. श्रावण फेरीसाठी केवळ नाशिक, कळवण, सिन्नर, येवला, इगतपुरी, दिंडोरीसह राज्यभरातील भाविक कोरोनाचे संकट टळल्यानंतर त्र्यंबकेश्वरी नतमस्तक होतील हे नक्की.- शामराव गंगापुत्र, प्रसाद व्यावसायिक श्रावणात पुजेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत असे. पण यंदा कोविड महामारीचा फटका बसला. वाईट वाटते. सर्व शहर बंद असल्याने आज मंदीर ओस पडले आहे. मंदीचा विळखा पडला आहे. व्यावसायिकांची कोंडी झाली आहे. हातावर पोट भरणाऱ्यांची तर उपासमार होत आहे.- सुभाष भुतडा,किराणा व्यावसायिक
त्र्यंबकेश्वर येथे कोरोनाने रोखली भाविकांची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 10:11 PM
त्र्यंबकेश्वर : श्रावण महिना सुरू झाला की, त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून जायची. त्यातही श्रावणी सोमवारी तर भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी व्हायचीे. यंदा मात्र कोरोनाने भाविकांची वाट रोखली असल्याने त्र्यंबकनगरी ओस पडली आहे.
ठळक मुद्देश्रावणातील पहिला सोमवार भक्तांविना : व्यावसायिकांची आर्थिक कोंडी, ब्रह्मगिरीची फेरीही टळली