नाशिक: बाधिताच्या संपर्कातील एका संशयित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी गेलेल्या पथकाच्या हातातून निसटून एका नागरिकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाईकवरुन पळून जाण्यासाठी तो किक मारत असतानाच त्याचे ह्दयविकाराने निधन झाले. त्याचे निधन कोरोनाच्या धसक्याने झाले असण्याची शक्यता गृहित धरुन मनपाच्या वतीने कोरोनाला घाबरुन न जाण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.वडाळा नाका येथील ५५ वर्ष वयाचा पुरु ष बाधित रु ग्णाच्या संपर्कातील असल्याकारणाने समाज कल्याण वसतिगृह या केअर सेंटरमध्ये ४ जुलैला भरती करण्यात आले होते. ५ जुलैला त्यांचा तपासणी नमुना घेण्यात येणार होता. या रु ग्णास कुठलाही प्रकारचा त्रास होत नव्हता. परंतु त्याने मला खाजगी हॉस्पिटलला जायचे असल्याचे म्हणताना कोणता ते सांगितले नाही. त्यामुळे झाकीर हुसेन रूग्णालयात नेण्याकरता अथवा त्याच्या आवडीच्या रूग्णालयात पाठविणे करता त्याला अॅम्बुलन्स मध्ये बसविण्यात आले. अॅम्ब्युलन्स सुरू होताच त्याने दरवाजा उघडून पळ काढला व स्वत:च्या मोटरसायकलला किक मारून पळून जाऊ लागला. त्याच वेळेस या व्यक्तीस हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन तो तेथेच कोसळला. डॉक्टरांनी त्याला ताबडतोब बघून अॅम्ब्युलन्समधून जाकिर हुसेन रु ग्णालयात घेऊन आले. परंतु तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले . संबंधित मृत व्यक्तीस शवविच्छेदन करीता सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.
कोरोना संशयिताचा पळून जाताना ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 7:00 PM
बाधिताच्या संपर्कातील एका संशयित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी गेलेल्या पथकाच्या हातातून निसटून एका नागरिकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाईकवरुन पळून जाण्यासाठी तो किक मारत असतानाच त्याचे ह्दयविकाराने निधन झाले. त्याचे निधन कोरोनाच्या धसक्याने झाले असण्याची शक्यता गृहित धरुन मनपाच्या वतीने कोरोनाला घाबरुन न जाण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
ठळक मुद्देनागरिकांना घाबरु नये असे आवाहनमहापालिकेच्या वतीने पुढाकार