चौकट -
कुठे कुठे केली कॉस्ट कटिंग १. किराणा सामानात दर महिन्याला येणाऱ्या अनावश्यक वस्तू कमी केल्याने किमान एक हजार रुपयांची बचत झाली.
२. सलूनमध्ये न जाता घरीच दाढी करण्यास सुरुवात केली. त्यातून महिन्याला ५०० रुपये वाचले.
३. काळा चहा पिण्याची सवय लागली. त्यातून दुधाचे दरमहा ९०० रुपयांची झाली बचत. ४. हॉटेलला जाणे बंद केल्याने महिन्याला होणारा १५०० रुपयांचा अतिरिक्त खर्च कमी झाला. ५. घरातच कपड्यांना इस्त्री होऊ लागल्याने लाँड्रीचे ७०० रुपये कमी झाले.
चौकट -
दाढी, कटिंग घरीच
पूर्वी सलूनमध्ये जाऊनच दोन दिवसआड दाढी करायचो, पण लॉकडाऊनच्या काळात घरीच दाढी करण्याची सवय लागली ती आता कायमची होऊ लागली आहे. यामुळे दर महिन्याला केवळ दाढीसाठी होणारा सुमारे ५०० रुपयांचा खर्च वाचला आहे.
चौकट -
सकाळी आणि सायंकाळी काळा चहा पिण्यास सुरुवात केल्याने दिवसाला एक लीटरऐवजी अर्धा लीटर दूधही पुरे पडू लागल्याने दूध कमी केले. त्यातून ७०० ते ८०० रुपयांची बचत होऊ लागली. आता सणवारालाच अधिक दूध मागविले जाते.
चौकट -
किराणा सामानात गरज नसताना किंवा राहु द्यावे हाताशी या विचारातून काही अनावश्यक वस्तूंची खरेदी होत होती. ती कटाक्षाने टाळली. यामुळे या वस्तूंसाठी दरमहा होणारा हजार ते बाराशे रुपयांचा खर्च वाचला आहे.