निफाड येथील ग्रामसंस्कार केंद्रात या कोरोना चाचणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी ६० जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने या कोरोना चाचणीसाठी रॅपिड अँटिजन टेस्टचे ५०० किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तर पुढील रॅपिड अँटिजन टेस्टचे ५०० किट निफाड नगरपंचायतीच्या वतीने देण्यात येणार आहेत. एकूण १००० जणांची कोरोना चाचणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दररोज ५० ते १०० जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
‘माझे कुटुंब, माझी जबादारी’ या मोहिमेंतर्गत आशा वर्कर आणि शिक्षक यांचे पथक निफाड शहरात प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करीत असून, यात कुटुंबातील संशयित नागरिकांची सुद्धा कोरोना चाचणी ग्रामसंस्कार केंद्रात करण्यात येत आहे. निफाड नगरपंचायतीचे कर्मचारी हे दुकानदार, व्यापारी यांच्याशी संपर्क करून त्यांना कोरोना चाचणी करण्यासाठी पाठवत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कोरोना चाचणी मोहीम राबवण्यात येत असून, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी निफाडचे गटविकास अधिकारी संदीप कराड, तालुका कोविड संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे, नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मंडलिक, आरोग्य कर्मचारी, निफाड नगरपंचायतीचे कर्मचारी यांचे सहकार्य मिळत आहे.
कोट.....
नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, निर्बंध काळात प्रत्येकाने घरीच थांबणे या नियमांचे पालन करावे, तसेच जास्तीत जास्त दुकानदार व व्यापारी यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
- डॉ. श्रीया देवचके, मुख्याधिकारी