नाशिक : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या वतीने नाशिकमधील कोरोना टेस्टिंग लॅबला मंजुरी मिळाली असून, येत्या आठवडाभरात नाशिकमधूनच कोरोनाची तपासणी शक्य होणार आहे. आडगावच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात ही टेस्टिंग लॅब कार्यरत होणार असून, कोरोनाच्या संशयितांना एक दिवसातच अहवाल मिळू शकणार असल्याने अहवालाची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.मविप्र समाज संस्थेच्या डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयात ही कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यासाठीची यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली आहे. त्याशिवाय महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाने चाचणीचे अजून एक मशीन उपलब्ध करून दिले आहे. त्यानंतर या प्रयोगशाळेत अहवालाची पहिली ट्रायलदेखील घेण्यात आली असून, सदर चाचणी अहवाल यशस्वी ठरला आहे. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात ही चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार पालकमंत्री छगन भुजबळ, उपसभापती नरहरी झिरवाळ यांनीदेखील नाशकात ही प्रयोगशाळा त्वरित सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. नानासाहेब पाटील, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. नीता गांगुर्डे आणि दातार जेनेटीक्सचे डॉ. दादासाहेब अकोलकर यांनी परिश्रम घेतले.या प्रयोगशाळेतील एका मशीनद्वारे तासाला दहा तर दोन मशीन असल्याने तासाला वीस अशा चाचण्या होऊ शकणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या संशयितांच्या दिवसभरात १८० ते २०० चाचण्या करणे शक्य होणार आहे. त्यामुळे सर्व चाचण्या वेगाने पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.कोरोना टेस्टिंग लॅबची सर्व पूर्तता झाली असून, महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा कार्यरत होण्यास सज्ज आहे. आता केवळ शासनाकडून मिळणाºया टेस्टिंग किटची प्रतीक्षा आहे. जिल्हा प्रशासनाकडून ती लवकरच उपलब्ध करून दिली जाणार असल्याने या आठवड्यातच लॅबमधून अहवाल देण्यास प्रारंभ होऊ शकणार आहे.- डॉ. मृणाल पाटील, अधिष्ठाता, डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालय
कोरोना टेस्टिंग लॅबला मंजुरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:13 PM
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या वतीने नाशिकमधील कोरोना टेस्टिंग लॅबला मंजुरी मिळाली असून, येत्या आठवडाभरात नाशिकमधूनच कोरोनाची तपासणी शक्य होणार आहे. आडगावच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात ही टेस्टिंग लॅब कार्यरत होणार असून, कोरोनाच्या संशयितांना एक दिवसातच अहवाल मिळू शकणार असल्याने अहवालाची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.
ठळक मुद्देशुभवर्तमान : आठवडाभरात नाशिकमधूनच मिळू शकणार तपासणी अहवाल