नाशिक : जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या समन्वयातून कोरोनाबाधित बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विविध माध्यमांतून करण्यात आलेल्या तीन लाख चार हजार १०३ चाचण्यांचे योगदान उपयुक्त ठरले आहे. मृत्युदरही कमी असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांनी तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शहरातच दोन लाख १४ हजार ८४५, तर ग्रामीण क्षेत्रांमध्ये ६४ हजार ५९८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मालेगावमध्ये २३ हजार ५०६ इतक्या चाचण्या, तर जिल्हाबाह्य रुग्णांच्या ११५४ चाचण्या करण्यात आल्या आहेत.विभागातील अन्य तीन जिल्हे मिळून लॅबमध्ये ६ लाख ४८ हजार ३३७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. म्हणजेच अन्य तीन जिल्ह्यांच्या बरोबरीने नाशिक जिल्ह्यात चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. चाचण्या जास्त झाल्यामुळेच बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त होते. चाचणी होऊन रु ग्ण सापडल्याने जिल्ह्यात मृत्युदर सर्वांत कमी दिसून येतो. शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांच्या वर पोहोचले आहे. मालेगावमध्ये हेच प्रमाण ८८.७७ टक्के, तर ग्रामीण क्षेत्रांमध्ये ८१.९२ टक्के आणि जिल्हा बाह्यरुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.५६ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.४५ टक्के आहे.
जिल्ह्यात कोरोना चाचण्यांनी ओलांडला तीन लाखांचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 1:16 AM
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या समन्वयातून कोरोनाबाधित बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विविध माध्यमांतून करण्यात आलेल्या तीन लाख चार हजार १०३ चाचण्यांचे योगदान उपयुक्त ठरले आहे. मृत्युदरही कमी असल्याचे दिसून येते.
ठळक मुद्देमृत्युदर कमी : रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ