नाशिक : नाशिकसह उत्तर महाराष्टÑातील सर्व जिल्ह्यांचे अहवाल गुरुवारपासून धुळ्याच्या प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. त्यामुळे गत आठवडाभरापासून अहवाल मिळण्यातील विलंब टळून झटपट दुसऱ्या दिवशी कोरोना संशयितांचा अहवाल मिळणे शक्य होणार आहे.धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाच्या विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेत या चाचण्या केल्या जाणार आहेत. यापूर्वी संपूर्ण महाराष्टतील कोरोना संशयितांच्या चाचण्या या केवळ पुण्यातील प्रयोगशाळेतच सुरू होत्या. त्यामुळे संपूर्ण महाराष्त रुग्णांची संख्या वाढू लागल्यापासून नाशिकच्या संशयितांचे अहवाल मिळण्यास दोन दिवसांहून अधिक वेळ लागत असल्याचे प्रकार सातत्याने घडू लागले. पुण्यात अहोरात्र शिफ्टमध्ये काम करूनदेखील अहवाल त्वरित त्याच किंवा दुसºयाच दिवशी मिळणे शक्य होत नव्हते. त्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील या प्रयोगशाळेची उपलब्धता नाशिकसह उत्तर महाराष्टतील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारच्या कोरोना टेस्टची सेवा देणारी ही पहिलीच प्रयोगशाळा असून, त्याचा फायदा नाशिकला होणार आहे.केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या साथीचे आजार आणि नैसर्गिक आपत्ती यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रयोगशाळांचे जाळे स्थापन करण्याच्या योजनेअंतर्गत या प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, २०० चौरस मीटरची जागा या प्रयोगशाळेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.अंतर आणि वेळदेखील कमीपुण्याच्या तुलनेत धुळ्याचे अंतर कमी तसेच पुण्याच्या तुलनेत जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी दोन तासांचा वेळदेखील कमी लागतो. त्यामुळे नाशिकचे नमुने अत्यल्प वेळेत धुळ्याला पोहोचणे तसेच पुण्याच्या तुलनेत कमी नमुने असल्याने त्यांचे अहवालदेखील दिवसभरात मिळणे शक्य होणार आहे. त्यामुळे सर्वच वेळांमध्ये बचत होऊन संशयितांना त्वरित अहवाल मिळू शकणार आहे.
कोरोनाच्या चाचण्या गुरुवारपासून धुळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 5:57 PM
नाशिक : नाशिकसह उत्तर महाराष्टÑातील सर्व जिल्ह्यांचे अहवाल गुरुवारपासून धुळ्याच्या प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. त्यामुळे गत आठवडाभरापासून अहवाल मिळण्यातील विलंब टळून झटपट दुसऱ्या दिवशी कोरोना संशयितांचा अहवाल मिळणे शक्य होणार आहे.
ठळक मुद्देअहवालातील विलंब टळण्याची शक्यताउत्तर महाराष्ट्रात सेवा देणारी पहिलीच प्रयोगशाळा