नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि.१८) १२४ नागरिक बाधित आढळले असून, दुपटीहून अधिक २५५ रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना उपचारार्थी रुग्णसंख्या एक हजाराखाली म्हणजे ९८८ पर्यंत खाली आली आहे. उपचारार्थी रुग्णसंख्या लक्षणीय घटल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे.उपचारार्थी रुग्णांपैकी सर्वाधिक ७७१ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १६७ रुग्ण नाशिक मनपात, ११ मालेगाव मनपात, तर जिल्हाबाह्य ३९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून, एकूण बळींची संख्या ८८८५ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट २.७० टक्क्यांपर्यंत घटला आहे, तर कोरोनामुक्ततेचा दर ९७.९२ टक्क्यांवर गेला आहे. कोरोनाचे ९६७ अहवाल प्रलंबित असून, त्यातही आता वेगाने घट येण्याची चिन्हे आहे.
कोरोना उपचारार्थी रुग्णसंख्या एक हजाराखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 1:29 AM