नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. ६) एकूण ६०२ नागरिक नव्याने बाधित झाले असून ९४८ कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक रहात असल्याने कोरोना उपचारार्थींची एकूण संख्या ५ हजारपेक्षा कमी म्हणजे ४८०१ वर पोहोचली आहे.
दरम्यान दिवसभरात ४ नागरिकांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ८८४५ वर पोहोचली आहे. दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये २ नाशिक मनपा आणि २ नाशिक ग्रामीणचे होते. जिल्ह्यात बाधित झालेल्या ६०२ बाधितांपैकी ३४५ नाशिक ग्रामीणचे, २३९ नाशिक मनपाचे, १६ जिल्हा बाह्य तर २ मालेगाव मनपाचे आहेत. दरम्यान जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या घटून ४७० वर आली असून कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेटदेखील ९.६६ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. दरम्यान कोरोनामुक्ततेच्या सरासरी प्रमाणात वाढ होऊन ते ९७.११ टक्क्यांवर गेले आहे.