येवला : तालुक्यातील अनकाई येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीर संपन्न झाले.ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी (दि.११) झालेल्या या शिबीराचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाला. अनकाई, वसंतनगर, गोरखनगर येथील जनतेला सावरगाव किंवा नगरसुल येथे जाऊन लसीकरण करणे अवघड असल्याने अनकाई ग्रामपंचायत सरपंच नगिना कासलीवाल, माणुसकी फाऊंडेशनचे अध्यक्ष अलकेश कासलीवाल यांनी वेळोवेळी आरोग्य विभागाकडे लसीकरण शिबीर घेण्याची मागणी केली होती.सावरगाव, कुसुर आरोग्यकेंद्र व ग्रामपंचायत अनकाईच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबीर घेण्यात आले. शिबीरात ४५ वर्षा पुढील शंभर ग्रामस्थांची कोराना चाचणी व लसीकरण करण्यात आले. लस शिल्लक न राहिल्याने अनेक ग्रामस्थ लसीकरणापासून वंचीत रहावे लागले. पुढील आठवड्यात पुन्हा शिबीर घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.लसीकरण शिबीरासाठी आलेल्या डॉक्टर, नर्स व आशासेविकांना सन्मानित करण्यात आले.लसीकरण शिबीर यशस्वीतेसाठी उपसरपंच शिवम अहिरे, डॉ. प्रितम वैद्य, सागर सोनवणे, संतोष टिटवे, राजाराम पवार, किरण बडे, बाळू बोराडे, बाळू चव्हाण, शरद सोनवणे, मारुती वैद्य, उत्तम देवकर, दिपक वाघ, भारत जाधव, किरण जाधव, देविदास पवार, ग्रामसेवक भाबड, ग्रामसंघाच्या सरला काळे, लता खंडेझोड, रेखा खंडेझोड, विलास अहिरे, सचिन बडे, शरद देवकर आदींनी प्रयत्न केले.
अनकाई येथे कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 12:04 AM
येवला : तालुक्यातील अनकाई येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीर संपन्न झाले.
ठळक मुद्देडॉक्टर, नर्स व आशासेविकांना सन्मानित करण्यात आले.