नाशिक : कोरोनावर प्रभावी लस शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले असून, सध्या त्याची चाचणी सुरू असली तरी, नाशिक जिल्ह्यात जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात अथवा मार्च महिन्यात सदरची लस उपलब्ध होण्याची शक्यता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी व्यक्त केली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार असून, त्यानंतर अन्य घटकांसाठी लस उपलब्ध असेल असेही ते म्हणाले. कोरोनावर देशात व विदेशातही लस उपलब्ध झाली असली तरी, राज्यात कोणत्या कंपनीची लस मिळेल हे स्पष्ट झालेले नाही. तथापि, लस उपलब्ध झाल्यास त्याचे तत्काळ लसीकरण करण्याची संपूर्ण तयारी शासनाने आरोग्य खात्याकडून करून घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासनाकडून प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार असल्याने प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्याच बरोबर खासगी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची माहितीदेखील संकलित करून ती शासनास पाठविण्यात आली असून, नाशिक व मालेगाव महापालिका असे सर्व मिळून जवळपास ३२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ही लस उपलब्ध होईल. सध्या लसीची चाचणी सुरू असल्याने जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ती उपलब्ध होण्याची शक्यताही आहेर यांनी व्यक्त केली. साइड इफेक्ट रोखण्यासाठी घेणार दक्षतालसीच्या साइड इफेक्ट व जनतेत त्याविषयीची असलेली भीती निरर्थक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कोणतीही लस अथवा इंजेक्शन घेतल्यास त्याची काही प्रमाणात रिॲक्शन येतेच. त्यामुळे कोरोना लसीच्या बाबतीत तसे झाल्यास त्यासाठी पुरेपूर काळजी घेण्याची तयारी करण्यात आलेली असून, लसीकरणाच्या ठिकाणी रुग्णवाहिका व तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली जाईल. लस दिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला ३० मिनिटे तेथेच थांबवून ठेवून त्यावर लक्ष ठेवण्यात येईल व त्यानंतरच बाहेर जाऊ देण्यात येणार असल्याचे डॉ. आहेर यांनी सांगितले.
जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाची लस येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 1:25 AM
कोरोनावर प्रभावी लस शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले असून, सध्या त्याची चाचणी सुरू असली तरी, नाशिक जिल्ह्यात जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात अथवा मार्च महिन्यात सदरची लस उपलब्ध होण्याची शक्यता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी व्यक्त केली.
ठळक मुद्देजिल्ह्याचा आराखडा तयार : ३२ हजारांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण