नाशिक : कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांसाच्या घरापर्यंत अत्यावश्यक वस्तू पोहचविण्यासाठी अहोरात्र सेवा बाजवणारे वाहन चालकही कोरोना योद्धाच असल्याचे मत नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी विनय आहिरे यांनी व्यक्त केले आहे.
नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे वतीने रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त रविवारी (दि.७) आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मुठाळ, लायन्स सुप्रीमचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, सतीश कोठारी, अनिल सारडा, दिलीपसिंग बेनिवाल, पी.एम.सैनी, एम.पी. मित्तल ,सुनील बुरड, जे.पी. जाधव, सुभाष जांगडा, जयपाल शर्मा शंकरराव धनावडे, आदी उपस्थित होते. विनय आहिरे म्हणाले, चालक हा वाहतूक व्यवसायाचा कणा असून चालक सुरक्षित व आरोग्यदायी राहण्यासाठी अशाप्रकारे त्यांनी नियमित तपासणी आवश्यक आहे. अपघात रोखण्यासाठी चालकांची भूमिका महत्त्वाची आहे. चालकांनी योग्य खबरदारी घेतली तर अपघातांची संख्या ही नक्कीच कमी होऊ शकते. त्यासाठी चालकांनी व्यसन आणि वेगावर नियंत्रण राखावे, असे आवाहन त्यांनी केले. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या कामकाजाची माहिती अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिली. प्रास्ताविक जे.पी.जाधव, सूत्रसंचालन शंकरराव धनावडे तर आभार अध्यक्ष राजेंद्र फड यांनी केले.
--इन्फो--
नेत्र, एड्ससह आरोग्य तपासणी
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने चालकांच्या डोळ्यांची तपासणी, एड्स आजाराबाबत तपासणी तसेच इतर आजाराबाबत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच चालकांना मोफत वैद्यकीय सुविधाही पुरविण्यात आल्या.
इन्फो-
सिग्नलवर वाहतूक नियमांचे फलक
नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन, परिवहन विभाग व वाहतूक पोलीस यांच्या सहकार्यातून रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने नाशिक शहरातील सर्व सिग्नलवर वाहतूक नियमांची जनजागृती होण्यासाठी फलक लावण्यात येणार आहे. या फलकांचे अनावरण नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोशिएशनकडून आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
===Photopath===
070221\07nsk_1_07022021_13.jpg
===Caption===
रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती फलकाचे अनावरण करताना नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी विनय आहिरे. समवेत संतोष मंडलेचा , राजेंद्र फड, ष प्रभाकर पाटील, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, सतीश कोठारी, अनिल सारडा, दिलीपसिंग बेनिवाल, पी.एम.सैनी, एम.पी.मित्तल ,सुनील बुरड, जे.पी.जाधव, सुभाष जांगडा, जयपाल शर्मा शंकरराव धनावडे आदि.