डांगसौंदाणे येथे समर्पित कोरोना केंद्र कार्यान्वित करण्यात आले. इतर तालुक्यांच्या तुलनेने या तालुक्याचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे डांगसौंदाणे येथील केंद्रात तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथील विलगीकरण , कोरोना केंद्र व खासगी रुग्णालयाकडून संदर्भित संशयित , बाधित व गंभीर रुग्णांवर वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप घोंगडे ,डॉ. चौरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त केले. वैद्यकीय अधीक्षक या नात्याने रुग्णालयाची धुरा डॉ. घोंगडे यांच्याकडे असून ते बालरोग तज्ज्ञ आहेत. त्यांना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश चौरे व इतर वैद्यकीय अधिकारी, डॉ. रुपेश खैरनार, डॉ. राहुल खैरनार , डॉ. दिनेश पंचभाई , डॉ. कुणाल मोरे , डॉ. अश्विनी देवरे , डॉ. राजश्री भामरे ,डॉ. स्वाती खैरनार, डॉ. विश्वास देवरे, डॉ. वीरेंद्र आवारी यांची साथ मिळाली . रुग्णसेवेच्या कामात शुश्रूषा संवर्गातील ज्योती महाजन, आम्रपाली बोरसे, हेमंत देवरे , करणकुमार शेवाळे, सायली निकम, प्रज्ञा महिरे यांचे मोलाचे योगदान लाभले होते.कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना डॉ. घोंगडे , डॉ. चौरे ,डॉ. देवरे व क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तरीदेखील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ते चौघेही नव्या जोमाने सेवा बजावत आहेत .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर व मास्क वापरुन बुधवारी (दि. १६) पार पडलेल्या गौरव समारंभात प्रातिनिधिक स्वरुपात डॉ .घोंगडे यांचा महारष्ट्र निसर्ग पर्यावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जलतज्ज्ञ डॉ. किशोर कुंवर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्र , पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देवून तर , शुश्रुषा संवर्ग, तांत्रिक संवर्ग प्रशासन विभाग व स्वच्छता कर्मचाऱ्यांपैकी प्रत्येकी एकाला गुलाबपुष्प व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी शुश्रुषा संवर्गातील अधिपरिचारिका ज्योती महाजन, करणकुमार शेवाळे, प्रज्ञा महिरे , सायली निकम, सुवार्ता देसाई, उखडी देसाई ,रेखा बहिरम , सुरेखा पाडवी, कार्यालयीन अधिक्षक महेंद्र महाले , विकास थोरात, संतोष दुसाने, रवी शिंदे, भास्कर ठाकरे ,संगीता शिंदे ,संतोष मोरे , योगेश बर्डे , कांतीलाल पवार या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
डांगसौंदाणेच्या ग्रामीण रुग्णालयात कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 2:15 PM