नाशिक: कोरेानाचा प्रभाव वाढू लागल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या देखील कमी झाल्याचे दिसत आहे. इतरवेळी दररोज ७०० ते ८०० अभ्यागत जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतांना गेल्या आठवड्यापासून ही संख्या निम्यावर आली आहे. आता दिवसाला केवळ साडेतीनशे ते चारशेच अभ्यागत कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाची पायरी चढत आहे.
जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असल्याने या ठिकाणी दररोज हजारेा लोकांची येजा सुरू असते. विविध प्रकारचे परवाने, प्रस्ताव, ना हरकत दाखले, प्रमाणपत्रे तसेच योजना, सुनावणी आदि कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या मोठी असते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तलाठी, प्रांत, रेाजगार हमी, वनहक्क, पुरवठा विभाग, निवडणूक शाखा, ग्रामपंचायत विभाग, गौण खनिज, रोजगार हमी, संजय गांधी निराधार योजना, मुद्रांक विभाग, विवाह नोंदणी आदि ५२ विभाग आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात वर्दळ असते.
प्रत्यक्ष मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर घेतल्या जाणाऱ्या नोंदणीनुसार कार्यालयात दररोज ७०० ते ८०० इतके अभ्यागत कार्यालयात येतात. परंतू गेल्या आठ दिवसांपासून येणाऱ्यांची संख्या कमी झाली असून ही संख्या केवळ ३५० ते ४०० इतकीच झाली आहे. कोरोनाचा प्रकोप वाढू लागल्याने कार्यालयात येणाऱ्यांची गर्दी कमी झाल्याचे दिसते.
===Photopath===
170321\17nsk_24_17032021_13.jpg
===Caption===
कलेक्टर ऑफीस