लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक- शहरात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता यण्या अडचणी, बेडस मिळण्यास येणा-या अडचणी आणि आॅक्सिजन पाठोपाठ टेस्ट किटसची जाणवणारी टंचाई यावर मंगळवारी (दि.१५) महासभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.अर्थात, त्यातून महापालिकेच्या रूग्णालयातील उणिवा दुर करून त्यात सुधारणा होण्याची देखील शक्यता आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.१५) मासिक महासभा बोलविली आहे.या सभेत प्रशासनाने शासकिय सेवेतून आलेल्या दोन अधिका-यांना रूजु करून घेण्याचे आणि कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांची मानीव तारीख संदर्भातील तीन प्रस्ताव आहे. तथापि, ही सभा कोरोनावरून गाजण्याची शक्यता अधिक आहे. विशेषत: उपमहापौर भिकूबाई बागुल यांनी विशेष महासभेची मागणी केली होती. महापौरांनी विशेष महासभा बोलवली नसली तरी नियमीत सभेत अवघेदोन ते तीन नाममात्र विषय असल्याने ही कोरोना विशेष सभा होण्याची शक्यता आहे.शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून महापालिकेने डॉ. झाकीर हुसेन रूग्णालय तसेच बिटको रूग्णालयात कोरोना बाधीत रूग्णांच्या उपचाराची व्यवस्था आहे. मात्र, त्याठिकाणी सुविधांचा अभाव आहे. त्याबाबत गेल्या स्थायी समितीच्या बैठकीत देखील जोरदार चर्चा झाली होत. मात्र, आरोग्य व्यवस्थांच्या अभावाबाबत नगरसेवक नाराज आहेत. मध्यंतरी बेड उपलब्धतेचा विषय गाजला आता आॅक्सिजन टंचाई तो विषय मार्गी लागत नाही तोच आता महापालिकेने अचानक अॅँटीजेन टेस्ट किटस कमी केल्या आहेत. किटस उपलब्धता हे एक महत्वाचे कारण असले तरी या चाचण्या बंद झाल्याने अनेकांना खासगी लॅबचा आधार घ्यावा लागत आहे.याशिवाय महापालिकेला पीएम केअर मधून मिळाल्या व्हेंटीलेटर्स पैकी १५ व्हेंटीलेटर्स नादुरस्त आढळले, त्यातच नोकरभरतीसाठी वारंवार प्रयत्न करून देखील कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने अडचण येत आहे. महपाालिकेचे कर्मचारी जोखमीने काम करत असताना त्यांना अपेक्षीत वैद्यकिय विम्याचे संरक्षण मिळालेले नाही, यावर देखील जोरदार चर्चा होणार आहे.