देवळा : काही दिवसांपूर्वी देवळा तालुक्यात आलेल्या मुंबईस्थित महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तिच्या संपर्कातील मेशी व वासोळपाडा येथील अकरा जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर देवळा तालुकावासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, तालुक्यातील दहिवड येथील एकास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल शुक्र वारी (दि. २९) रात्री उशिरा प्राप्त झाल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.याबाबत तालुका आरोग्य अधिकारी सुभाष मांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार दहिवड येथील शिंद ओहळ शिवारातील एक २८ वर्षीय तरु ण मुंबई येथे कामानिमित्त राहत होता. तो दि. २० मे रोजी त्याच्या दहिवद येथील घरी आला होता. परंतु दुसऱ्याच दिवशी त्याला ताप व जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने तो दहिवड येथील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी दाखल झाला होता. संबंधित रु ग्णाची लक्षणे संशयास्पद वाटल्याने त्याला चांदवड येथे पाठविण्यात आले होते. त्याच्या स्वॅबचा नमुना नाशिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. शुक्र वारी रात्री त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या रुग्णाला देवळा येथील कोविड केअर सेंटर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याच्या संपर्कातील पाच जणांना हायरिस्क क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.दरम्यान, या पार्श्वभूमीवर पांच कंदील चौकात देवळा पोलिसांनी वाहनांची तपासणी मोहीम पुन्हा सुरू केली आहे. प्रत्येक गावात वैध, अवैधरीत्या बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची चौकशी करण्यात येत आहे.तर दहिवड गावामध्ये आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील चौदा दिवसात संपूर्ण गावाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे, तर सदर रु ग्ण वास्तव्यास असलेला परिसर सील करण्यात आला असून, कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे.
दहिवड येथे कोरोनाबाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:06 PM
देवळा तालुक्यात आलेल्या मुंबईस्थित महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तिच्या संपर्कातील मेशी व वासोळपाडा येथील अकरा जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर देवळा तालुकावासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, तालुक्यातील दहिवड येथील एकास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल शुक्र वारी (दि. २९) रात्री उशिरा प्राप्त झाल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
ठळक मुद्देदेवळा तालुक्यात पहिला पॉझिटिव्ह अहवाल आल्याने चिंतेचे वातावरण