नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९३ हजार ०७८ कोरोनाबाधितांना पूर्णपणे बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. सद्य:स्थितीत २ हजार ४९७ रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत १ हजार ७३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आजपर्यंत जिल्ह्यात ९७ हजार ३११ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ९५.१२, टक्के, नाशिक शहरात ९६.०६ टक्के, मालेगावमध्ये ९३.३८ टक्के, तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.९२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.६५ इतके आहे. नाशिक ग्रामीण ६३९, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ८८६ मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून १७१ व जिल्हाबाहेरील ४० अशा एकूण १ हजार ७३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक ६४, चांदवड ११, सिन्नर २३३, दिंडोरी ३५, निफाड १५२, देवळा ११, नांदगाव ५०, येवला ८, त्र्यंबकेश्वर २८, सुरगाणा २, पेठ ३, कळवण ११, बागलाण ४९, इगतपुरी २६, मालेगाव ग्रामीण ४४ असे एकूण ७२७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६४७, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १०९ तर जिल्ह्याबाहेरील १४ असे एकूण २ हजार ४९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नाशिक मध्ये कोरोनाची ॲक्टिव्ह रुग्णसंख्या अडीच हजारांखाली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 3:55 PM
नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९३ हजार ०७८ कोरोनाबाधितांना पूर्णपणे बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. सद्य:स्थितीत २ हजार ४९७ रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत १ हजार ७३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ठळक मुद्देनाशिककरांना दिलासा जिल्ह्यात ९३ हजारकोरोनामुक्त