नाशिक जिल्ह्यात रूग्ण नाही म्हणता म्हणता २९ मार्च रोजी लासलगावच्या एका विक्रेत्याला रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आणि अखेरीस जिल्ह्यात केारोनाचा शिरकावा झालाच. त्यानंतर ६ एप्रिल रोजी नाशिक शहरात गोविंद नगर भागातील पहीला रूग्ण!तीन किलो मीटरचा परिसर सील असे वेगळ आणि अंगावर काटा आणणारं सारे काही घडत गेले. आधी मालेगाव हॉटस्पॉट ठरला आणि नंतर नाशिक शहर! कोरोना संसर्गामुळे जवळच्या लोकांचे जाणे अनेकांनी अनुभवले, स्मशान भूमी कमी पडावी इतकी कटू वेळ आली.
कोरोना, त्यामुळे लॉकडाऊन आणि नंतर सुरळीत होऊ पहाणारे जीवन आणि नंतर पुन्हा निर्बंधांकडे वाटचाल.... अशा टप्यावर येताना लॉकडाऊनच्या कटू आठवणी विसरता येणे शक्य नाही. पण लॉकडाऊन नकोच यावर मात्र साऱ्यांचे एकमत आहे.
इन्फो...
खरे तर कोरोनामुळे अनेक दुर्घटना घडला. जीवनाच्या पटलावर असा अनुभव नको असे साऱ्यांचेच मत आहे. मात्र कोरोनाने जीवन शैली बदलली. आरोग्याचे, माणुसकीचे आणि कर्तव्याचे धडे दिले. आराेग्य सुविधांच्या उणिवा देखील लक्षात आल्या. परिस्थितीचा गैरफायदा घेणारे देखील अनुभवास आले. परंतु त्यातून पुढे जाताना अनेक चांगल्या घटनाही घडल्या. शासकीय आरोग्य व्यवस्था सज्ज झाल्या. नवीन उद्योग, राेजगाराची साधने निर्माण झाली.
कोट...
गांभीर्याने परिस्थिती हाताळण्याची गरज
गेल्या वर्षी कोरोनाचे संकट आले आणि त्यामुळे लॉकडाऊन करावे लागले. आज कोरोनाचे नवे संकट पुन्हा उभे राहीले आहे. त्याकडे तितक्याच गांभीर्याने बघण्याची गरज आहे. शहरात रूग्णांच्या तुलनेत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रतिबंधित क्षेत्र आणि चाचण्या होत आहेत का, शासनाच्या निर्देशांचे पालन होते आहे काय याचा विचार करण्याची गरज आहे. गेल्या वर्षी ज्या पध्दतीने शहरातील परिस्थिती हाताळली गेली. त्याच पध्दतीने आता देखील गरज आहे.
- राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, महापालिका