शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पारावरच्या गप्पांना कोरोनाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 11:14 PM

जळगाव निंबायती : गावातील अथवा शहरातील मुख्य चौकात झाडाखाली, तसेच मंदिरांच्या बाहेर पारावर बसून गप्पागोष्टी करण्याची एक आगळीवेगळी संस्कृती खेड्यागावात पहावयास मिळते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे, गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे पारावरच्या गप्पा पूर्णपणे बंद पडल्या असून, सर्वत्रच पार ओस पडलेले दिसत आहेत.

ठळक मुद्देजळगाव निंबायती : ग्रामीण भागात नागरिकांकडूनच सतर्कता

अमोल अहिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव निंबायती : गावातील अथवा शहरातील मुख्य चौकात झाडाखाली, तसेच मंदिरांच्या बाहेर पारावर बसून गप्पागोष्टी करण्याची एक आगळीवेगळी संस्कृती खेड्यागावात पहावयास मिळते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे, गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे पारावरच्या गप्पा पूर्णपणे बंद पडल्या असून, सर्वत्रच पार ओस पडलेले दिसत आहेत.पार म्हणजे काय हे आता नव्याने सांगायला नको. मात्र युवा पिढीला विशेषत: शहरी भागातील तरुणाईला आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात देशातील बहुधा सर्वच भागात पूर्वापारपासून प्रचलित असलेली ही ह्यपारह्ण संस्कृतीची माहिती अथवा अनुभव फारसा नसावा. मात्र अनेक गावं तसेच शहरामध्ये असलेले पार, ओटा आजही अनेक ऐतिहासिक घटनांचे प्रत्यक्ष मूक साक्षीदार आहेत. प्रत्येक गावात जुन्या पिंपळाच्या, कडुलिंबाच्या किंवा वडाच्या झाडाभोवती जो मोठा ओटा असतो तो म्हणजेच गप्पांचा एक कट्टा किंवा अड्डा. अनेक गावात झाडाभोवती असे पार बनवलेले आहेत. विसावा घेण्यासाठी तसेच गप्पांसाठी त्यांचा उपयोग होतो. ज्या पारावर घरातल्या राजकारणापासून ते थेट देशातल्या राजकारणापर्यंत थोडक्यात गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंतच्या गप्पा रंगतात तो कट्टा म्हणजे पार. या गप्पा अगदी अघळपघळ असतात.पूर्वी याच पारावर गावाचा न्यायनिवाडादेखील होत असे. अनेकांना या पारावरून न्याय मिळाल्याची अनेक उदाहरणे देता येतील. पारावर बसूनच पूर्वीच्या काळी गावातील आपापसातील तंटे सरपंच व पंचमंडळी सामोपचाराने मिटवत होते. पारावरच चावडी भरायची. पूर्वी छोट्या खेडेगावामध्ये पारावरच गावातील शाळाही भरत असे. स्वातंत्र्यपूर्व काळातदेखील या पारांना मोठे महत्त्व होते. अनेक महत्त्वपूर्ण घटना या पारावर बसूनच ठरत असायच्या. कधीकाळी हे पार सभेचे व्यासपीठ झालेले आपणास पहावयास मिळते. गावातल्या पोरांनी अनेक दिग्गजांची भाषणे या पाराभोवती बसून ऐकले आहेत. जसे गावात पार आहेत. त्याप्रमाणे शहरातदेखील या पारांना मोठा इतिहास आहे. शहरातील जुन्या भागामध्ये आजही अनेक पार इतिहासाची साक्ष देत तिथे टिकून आहेत. नाशकातील भद्रकाली परिसरातील ह्यपिंपळपारह्ण हे त्याचे उदाहरण आहे.पूर्वीच्या काळी घरात टीव्ही नव्हते. त्यामुळे जेवणाच्या वेळेपर्यंत लोक पारावर बसून मनसोक्त गप्पा मारत असत. आज घरोघरी टीव्ही आल्यामुळे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाइल आल्यामुळे पारावरच्या गप्पा फारच कमी झाल्या असल्या तरी, पूर्णपणे मात्र बंद झालेल्या नाहीत. कोणीतरी एखादा दुपारच्या वेळी पाराच्या कडेवर पाय सोडून निवांत बसलेला आपल्याला हमखास दिसायचा, मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीने पार पूर्णपणे निर्मनुष्य झाले आहेत.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाgram panchayatग्राम पंचायत