सिन्नर : तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी गेला असून, विंचूरदळवी येथील मनोविकार व उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या ६२ वर्षीय इसमाचा नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनाने मृृत्यू झाला.विंचूरदळवी येथील ६२वर्षीय इसमास थंडी-ताप आल्याने तो पांढुर्ली येथील एका खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी गेला होता. तेथेच त्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येते. २९ जून रोजी या रुग्णास सिन्नर उपजिल्हा रु ग्णालयात स्वॅब तपासणी करून नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी पाठविण्यात आले होते. ४ जुलै रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील यांनी दिली. या रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील पाच जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहे.----------------विंचूरदळवीत आत्तापर्यंत आठ कोरोनाबाधित रु ग्ण सापडले असून, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात यापूर्वी ठाणगाव, पांढुर्ली, दापूर येथील प्रत्येकी एक तर शिवडे येथील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
सिन्नर तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 9:42 PM