नाशिक : कोरोना विषाणूबाबतची माहिती, संशयित तसेच आजाराबाबतची अधिकृत माहिती देण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यात चार माहिती केंद्रे केलीे आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून, जिल्ह्यात कोणालाही कोरोना व्हायरसविषयी संशय असल्यास नागरिकांनी या माहिती केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू असून, याचा राज्यात तसेच नाशिक जिल्ह्याजवळील जिल्ह्यांमध्ये संसर्ग वाढला आहे. जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या २०० पेक्षा अधिक झाली आहे, मात्र त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या असून, अनेकांना त्यांच्या घरीच वैद्यकीय पथकांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. यातील जे आजारी पडले अशा ३९ जणांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३१ जणांचे पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर उर्वरित आठ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. अजून जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण सापडलेला नसला तरी या विषाणूविषयी सातत्याने समाज- माध्यमातून येणारी माहिती व यातून निर्माण होणारे समज-गैरसमज याचा मोठा परिणाम समाजात होत आहे. अनेक सोशल माध्यमांमधून कोरोना व्हायरसबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. असे प्रकार तसेच अफवा रोखण्यासाठी नागरिकांमध्ये या आजाराची खरी माहिती पोहोचावी, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे तसेच रुग्णांबाबत माहिती देणे, तसेच काही घटनांविषयीचे सत्य जाणून घेण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात चार माहिती केंदे्र सुरू करण्यात आली आहेत.या माहिती केंद्रांमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी नागरिकांच्या शंकांचे निरसन करणार आहेत.तक्रार अगर माहितीसाठी १०४ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून, प्रत्येक केंद्राचा संपर्क क्रमांक असून, नागरिक यावर कॉल करून आवश्यक माहिती जाणून घेऊ शकणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.जिल्ह्यातील माहिती केंद्र फोन नंबरनाशिक जिल्हा रुग्णालय ०२५३-२५७२०३८/२५७६१०६नाशिक महानगरपालिका ०२५३-२५९००४९नाशिक जिल्हा परिषद ०२५३-२५९००४९मालेगाव महानगरपालिका ०२५५४-२३१८१८
कोरोनासंबंधी जिल्ह्यात चार माहिती केंद्रे : जगदाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 11:52 PM