शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

मांगीतुंगीच्या कुंभमेळ्यावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 10:55 PM

नाशिक : बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथील प्रसिद्ध भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट विशालकाय मूर्तीच्या पंचकल्याणक सोहळ्यानिमित्त येत्या फेब्रुवारी २०२२ मध्ये जैन समाजाचा पवित्र कुंभमेळा भरणार आहे, मात्र या कुंभमेळ्यालाही कोरोनाचा अडसर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरीही देवस्थान समितीने कुंभमेळ्याची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देजैन धर्मीयांचा सोहळा : देवस्थान समितीची मात्र सज्जता

नाशिक : बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथील प्रसिद्ध भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट विशालकाय मूर्तीच्या पंचकल्याणक सोहळ्यानिमित्त येत्या फेब्रुवारी २०२२ मध्ये जैन समाजाचा पवित्र कुंभमेळा भरणार आहे, मात्र या कुंभमेळ्यालाही कोरोनाचा अडसर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरीही देवस्थान समितीने कुंभमेळ्याची तयारी सुरू केली आहे.सन २०१५ मध्ये भगवान ऋषभदेव यांच्या विशालकाय मूर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यानंतर नाशिक कुंभमेळ्याच्या धर्तीवर दर सहा वर्षांत मांगीतुंगी येथे कुंभमेळा भरणार असल्याची घोषणा पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी यांनी केली होती.मांगीतुंगी पहाडावर अखंड पाषाणात कोरलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट विशालकाय मूर्तीचा गेल्या ११ फेब्रुवारी २०१५ पासून दीड महिने पंचकल्याणक व महामस्तकाभिषेक सोहळा साजरा करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी देशभरातील आचार्य, मुनी, माताजी, साध्वीसह बारा ते पंचवीस लाखांपेक्षा अधिक भाविकांनी हजेरी लावल्याने या सोहळ्याला कुंभमेळ्याचे स्वरूप आले होते. शासनानेही जैन धर्मीयांच्या या कुंभमेळ्याला शासकीय कार्यक्रमाचे स्वरूप देऊन मांगीतुंगी आणि परिसराच्या विकासासाठी २७५ कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता दिली होती.कुंभमेळा फेब्रुवारी २०२२ मध्ये?समितीच्या बैठकीत आगामी कार्यक्रमही जाहीर करण्यात आले आहेत. जैन धर्मीयांच्या या सोहळ्याला आता कुंभमेळ्याचे स्वरूप देण्यात आले आहे. हा मेळा दर सहा वर्षांनी भरणार असल्याचे पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी यांनी जाहीर केले होते. आगामी सोहळा येत्या २०२२ मधील फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. त्याच्या तारखा देखील निश्चित केल्या जाणार आहेत. हा कुंभमेळा एक महिना भरणार असून त्यादरम्यान या विशालकाय मूर्तीचा अभिषेक विधी केला जाणार आहे. येणाऱ्या भाविकांसाठी शासनाच्या सहकार्याने निवासाची व्यवस्था केली जाणार आहे.भगवान ऋषभदेव देवस्थानाची कार्यकारिणी मांगीतुंगी येथे कुंभमेळा घेण्यासाठी केव्हाही सज्ज आहे, मात्र कोरोनाच्या महामारीमुळे शासनाचे नियम काय असतील त्यावरच कुंभमेळा भरविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अन्यथा काही दिवस हा कुंभमेळा पुढे ढकलण्याबाबत देवस्थान निर्णय घेईल.- संजय पापडीवाल, महामंत्री 

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरSocialसामाजिक