नाशिक- लॉकडाऊन काळात नाशिकमध्ये अडकलेल्या उत्तर भारतीयांना रेल्वेने त्यांच्या राज्यात पाठवण्यास सुरुवात झाली असून आज सकाळी आणखी एक रेल्वे लखनऊकडे रवाना झाली.नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आज सकाळी या सर्व मजूर आणि कामगारांना विशेष बसद्वारे आणण्यात आले. त्यानंतर फिजिकल डिस्टन्ससह सर्व नियमांचे पालन करून या सर्वांना रेल्वेच्या डब्यात बसवण्यात आले. तत्पूर्वी संपूर्ण रेल्वे निर्जंतुक करण्यात आली होती. उत्तर भारतीयांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ त्याचबरोबर जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.गेल्या 23 मार्च रोजी देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी घोषित करण्यात आल्यानंतर नाशिकमध्ये अनेक उत्तर भारतीय तसेच अन्य राज्यातील स्थलांतरित मजूर आणि कामगार अडकले आहेत. जिल्हा प्रशासन आणि नाशिक महापालिकेने त्यांची निवारा गृहात सोय केली होती. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपताना केंद्र सरकारने काही नियम शिथिल केले असून त्यांना आता त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येत आहे. काल रात्री ३३२ कामगारांना ६ डब्यांच्या विशेष रेल्वेने भोपाळ येथे पाठविण्यात आले आहे. आज लखनऊ येथे पाठवण्यात आले आहे.'या' व्यक्तींना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावंच लागणारचिंताजनक! अवघ्या २४ तासांत वाढले २२९३ रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३७ हजारांवरग्रीन झोनमध्ये दारूची दुकानं उघडणार, केंद्र सरकारची सशर्त परवानगी
CoronaVirus News in Nashik: नाशिकमधील उत्तर भारतीयांना घेऊन आणखी एक रेल्वे लखनऊकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 11:28 AM