शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण शंभरीपार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 3:37 PM

नाशिक - जिल्ह्यात रविवारी (दि.०२) दिवसभरात एकूण ११७ रुग्ण नव्याने बाधित आढळले असून, ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग ...

नाशिक - जिल्ह्यात रविवारी (दि.०२) दिवसभरात एकूण ११७ रुग्ण नव्याने बाधित आढळले असून, ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या शंभरीपार पोहोचल्याने उपचारार्थी रुग्णसंख्येत मोठी भर पडत असल्याने तीन दिवसांपूर्वी चारशेपर्यंत पोहोचलेली संख्या रविवारी ६९१ पर्यंत पोहोचली आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सलग वाढ होत असताना दिलासा देणारी बाब म्हणजे दिवसभरात एकाही कोरोना बळीची नोंद झालेली नाही. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असताना प्रलंबित अहवालांच्या संख्येत मात्र लक्षणीय घट झाली असून, ही संख्या १८९ पर्यंत कमी झाली आहे. त्यात नाशिक मनपा १४६, नाशिक ग्रामीण ३२, तर मालेगाव मनपाचे ११ अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान कोरोनामुक्ततेच्या प्रमाणात पुन्हा अल्पशी घट येऊन ते ९७.७२ टक्के झाले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित संख्येत मोठी वाढ झाल्याने कोराेना उपचारार्थी संख्यादेखील सातशेनजीक अर्थात ६९१ पर्यंत पोहोचली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी शून्य बळी

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी बळींची संख्या शून्य असल्याचा यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच गत आडवडाभरात तीनवेळा कोरोना बळी शून्य राहिले आहेत. रुग्णसंख्या वाढत असताना काहीसा दिलासा बळींमध्ये मिळाला असला तरी तो वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कितपत कायम राहील याबाबत साशंकताच आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक