नाशिक: जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषीत केला आहे. कोरोनाचा प्रसार देशासह राज्यात व आता नाशिक शहरातसुद्धा वेगाने पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. यासाठी प्ररिबांधात्मक उपाय म्हणून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मास्क वापरणे नागरिकांना सक्तीचे केले आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतंत्रपणे अधिसूचना गुरुवारी जारी केली.
कोरोना आजाराने राज्यात थैमान घातले असताना आता मुंबई-पुणे पाठवत नाशिकमध्येही रुग्ण वाढतांना दिसून येत आहे. नाशिक शहरात एक कोरोनाबाधित तर जिल्ह्यात सहा कोरोनाबाधित रुग्ण या चार दिवसांमध्ये आढळून आले आहेत. यापैकी मालेगावमध्ये आढळलेल्या एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यूही झाल्या आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली असून नाशिक शहर व जिल्ह्यात कोरणा आजाराला अटकाव करण्यासाठी बंदोबस्त कडक करण्यात आला असून संचारबंदी देखील अधिक प्रभावी पोलिसांकडून केली जात आहे. विनाकारण रस्त्यावर संचार करणार नाहीत याची खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे.
मुंबई पुणे पाठव नाशिकमध्येही नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात यात आले आहे जेणेकरून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखता येणे शक्य होईल असे प्रशासनाने म्हटले आहे. यासंदर्भात नांगरे-पाटील यांनी सात्र प्रतिबंधक कायदा 1897 फक्त नुसार शहरात नागरिकांनी मास्कचा वापर करावा अशी अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यातील तरतुदी तसेच भारतीय दंड संहिता कलम 1988 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील लोकसंख्येची घनता अतिशय दाट असल्याने कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रसार होण्यासाठी पोषक स्थिती उपलब्ध आहे. सद्यस्थितीत शहरात कोरोना विषाणुच्या संसर्गाची लक्षणे आढळून येत असलेल्या संशयित रुग्ण मोठया संख्येने उपचारासाठी शासकीय दवाखान्यात दाखल होत आहेत. त्याच वेळेला वैद्यकीय तपासणीअंती कोरोना विषाणुचा संसर्ग झालेल्या रूणांची संख्याहो वाढत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कोरोना विषाणुच्या प्रसाराच्या या टप्यात कोरोना विषाणुचा संसर्ग कित्येक पटीने वाढून नाशिक शहरातील लोकसंख्या बाधीत होऊ शकते. कोरोना विषाणुच्या या वाढत्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझरचा वापर व सुरक्षित सामासिक अंतर ठेवणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच कलम 144नुसार लोकांच्या संचारास मनाईदेखील करण्यात आली आहे.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधीत नागरिकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील. तसेच असे मास्क मानांकित प्रतिचे अथवा घरगुती पध्दतीने तयार केलेले व योग्य पध्दतीने स्वच्छ व निर्जतुक करून पुन्हा वापरता येण्याजोगे असेल याची खात्री बाळगावी, असेही ते म्हणाले.