आयुष्यात स्वत:च्या मालकीचे घर असावे ही सर्वांचीच इच्छा असते. अनेक जण तर घर खरेदीसाठी आयुष्याची पुंजी लावून देतात. परंतु घर खरेदीसाठी योग्य ती माहिती न घेतल्यास फसवणुकीची शक्यता असते. एखाद्या इमारतीत अतिरिक्त बांधकाम विकासकाडून झालेले असते. तर एखाद्या इमारतीत पार्किंगच्या जागेवर गाळे किंवा तत्सम अनेक प्रकार घडलेले असते. काही घरातील अर्धवट कंप्लीशन असते. घर घेताना अपुरी माहिती मिळाल्यनंतर किंवा कमी किमतीत मिळते म्हणून घाईघाईने नागरीक घर खरेदी करतात. आणि नंतर अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते. सातपूरच्या कामगार नगरजवळील स्वागत हाईटस मध्ये असाच प्रकार घडला हेाता तर अनेक भागात इमारतींना कंप्लीशन सर्टिफीकेट नसल्याने पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे आढळले होते. त्या पार्शभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ही हेल्पलाईन सुरू करण्याची कल्पना मांडली हेाती. त्यानुसार महापालिकेने ०२५३- २३१००३१ ही हेल्पलाईन सुरू करण्यात केली आहे त्यावर कार्यालयीन वेळेत दूरध्वनी केल्यास महापालिकेकडून त्या इमारती विषयी अधिक माहिती मिळू शकते.
इन्फो...
हेल्पलाईनवर ही मिळेल माहिती
घर नियमानुसार आहे किंवा नाही. बांधकाम सुरू केले असेल तर त्यासाठी परवानगी घेतली आहे किंवा नाही याबाबत माहिती दिली जाईल. ज्यांना महापालिकेत येऊन समक्ष हवी माहिती हवी असेल त्यांच्यासाठी शिवार निहाय कनिष्ठ अभियंता नियुक्त करण्यात आले असून ते सकाळी ११ ते १ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत उपलब्ध हेातील.