शहरात प्रादुर्भाव कमी आहे; मात्र कळवण, सटाणा, मालेगाव तालुका, देवळा येथील रुग्ण मालेगावी उपचार घेत आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून मनपाच्या कोरोना केंद्रात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. शहरात ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर इंजेक्शन कमी पडू नये तसेच खासगी रुग्णालयातील रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध होते की नाही, यासाठी आठ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. मालेगावी क्रॉसिंग ट्रेसिंग कमी जास्त आहे. महापालिका क्षेत्रातील रुग्णांवरही योग्य उपचार केले जात असून नागरिकांना योग्य त्या आरोग्य सुविधा पुरविण्यात येत असल्याचे महापौर शेख, मनपा आयुक्त गोसावी यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार रशीद शेख, उपायुक्त नितीन कापडणीस, मनपा आरोग्यधिकारी सपना ठाकरे आदी उपस्थित होते.
फोटो - २६ मालेगाव मेअर
===Photopath===
260421\26nsk_38_26042021_13.jpg
===Caption===
फोटो - २६ मालेगाव मेअर