महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
महापालिकेचे कोरोना सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलोड आणि डॉ. प्रशांत थेटेे यांची या कामासाठी नियुक्ती केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय तसेच बिटको रुग्णालयात तसेच सर्व कोविड सेंटर्सला अचानक भेटी द्याव्यात, येथे नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी वेळेत कामावर येऊन कर्तव्य बजावत आहेत की नाहीत, याची पाहणी करावी, राज्य टास्क फोर्सच्या आदेशानुसार उपचार हेात आहेत की नाहीत, याची तपासणी करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या रुग्णालयातील औषधे आणि इंजेक्शन्सचा साठा योग्य आहे की नाही, तसेच कर्मचारी कर्तव्याचे पालन करीत आहेत किंवा नाही, याची तपासणी करावी, असाही आदेश कैलास जाधव यांनी दिला आहे. त्यावर पलोड आणि शेटे या दोघांवर रुग्णालय आणि कोविड सेंटर्समध्ये तपासणीची जबाबदारी देण्यात आली असून, या दोघांना वैद्यकीय अधिक्षकांना अहवाल देण्यास बजावण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.