नाशिक : महापालिकेच्या वतीने गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाविरोधात लढा दिला जात असून वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे त्यांना आता अल्पविश्रांती देण्याचे नियोजन असून, सात दिवस संबंधितांना सुटी देण्याचे नियोजन सुरू आहे. यासंदर्भात आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर तत्काळ अंमल करण्यात येणार आहेत.कोरोनाचे महासंकट अचानक उद््भवल्यानंतर आरोग्य यंत्रणेसाठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचा स्टाफ अहोरात्र मेहनत घेत आहेत. आता बरीचशी सुरक्षा साधने उपलब्ध झाली असली तरी सुरुवातील अपुरे एन-९५ मास्क, तसेच ग्लोज आणि पीपीई अंतर्गत येणारे सुरक्षा गाउन नसतानादेखील अत्यंत जोखमीत त्यांनी काम केले आहे. त्यानंतर आता परिस्थिती निवाळेल, नंतर निवाळेल म्हणता म्हणता कोरोनाचा संसर्ग कायम आहे. नाशिक शहरात तर हा संसर्ग वाढतच आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचारी विशेषत: महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, बिटको रुग्णालय आणि क्वारंटाइन सेंटरमध्ये काम करणाऱ्यांना मात्र आता थकवा आल्याचे सांगितले जात आहे.महापालिकेत कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयातून कर्मचारी मागविण्यात आले आहेत. तथापि, आता त्यानंतरही या कर्मचाºयांना अल्पशी विश्रांती मिळावी यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी या कर्मचा-यांना सात दिवस सुट्या देण्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो आयुक्तांकडे सादर केला आहे. त्यांनी मान्यता दिल्यानंतर वैद्यकीय कर्मचाºयांना अल्पशी विश्रांती घेता येणार आहे.महापालिकेने वैद्यकीय कर्मचाºयांची गरजेनुसार भरती केली आहे. यात अलीकडेच ५० वॉर्डबॉय आणि ४० परिचारिकांना तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचा-यांना महापालिकेच्या नॉन कोविड रुग्णालयांसाठी नियुक्त करून तेथील कायम स्टाफ कोविड रुग्णालयात नियुक्तकरण्यात येईल आणि सध्याच्या कर्मचाºयांना सात दिवस सुटी देण्यात येईल अशाप्रकारचे नियोजन करण्यात आले आहे.
मनपाच्या कोरोना योद्धांना मिळणार अल्पविश्रांती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 6:12 PM
महापालिकेच्या वतीने गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाविरोधात लढा दिला जात असून वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे त्यांना आता अल्पविश्रांती देण्याचे नियोजन असून, सात दिवस संबंधितांना सुटी देण्याचे नियोजन सुरू आहे. यासंदर्भात आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर तत्काळ अंमल करण्यात येणार आहेत.
ठळक मुद्देसात दिवस सुटी प्रशासनाचा प्रस्ताव