महापालिकेची ऑनलाइन महासभा सोमवारी (दि.७) महापाैर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी हा प्रकार घडला. सिडकोतील प्रभाग क्रमांक २७,२८,२९ व ३१ मध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे सोमवारी महासभा सुरू होताच सिडकोतील नगरसेवकांनी महापौर सतीश कुलकर्णी ऑनलाइन सभा संचलित करीत असलेल्या ठिकाणी धडक दिली. मुकेश शहाणे, रत्नमाला राणे, चंद्रकांत खाडे, प्रतिभा पवार या सर्वांनीच ऑनलाइन सभेत जाऊन तक्रारी केल्या. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे दोन अभियंते रवींद्र धारणकर आणि गोकुळ पगारे यांच्यात वाद असल्याने एक अभियंता भल्या पहाटे पाणी सेाडून व्हॉल्व्हला कुलूप ठोकून जातो. तर दुसरीकडे पाणीपुरवठ्यासाठी नागरिकांना भ्रमंती करावी लागते. त्यावर उपाय म्हणून महापालिकेच्या वतीने तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महापौर सतीश कुलकर्णी यांनी यासंदर्भात कठोर भूमिका घेत नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अभियंत्याला निलंबित करू असे सांगितले व याच विषयावर मंगळवारी (दि.८) याविषयावर पाणीपुरवठा विभाग आणि सिडकोतील नगरसेवक यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे महापाैरांनी सांगितले.
...इन्फो...
नगरसेविका किरण दराडे यांचे टाकीवर चढून आंदोलन
सिडकोच्या प्रभाग क्रमांक २७ मध्ये आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने प्रभागाच्या नगरसेविका करण दराडे त्यांचे पती बाळा दराडे यांच्यासह अन्य अभियंत्यांनी पाथर्डी फाटा येथे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर टाकीवरून उडी मारण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी त्यांना भ्रमणध्वनी करून मंगळवारी होणाऱ्या बैठकीची माहिती दिली. त्यानंतर दराडे यांनी आंदोलन मागे घेतले.
.....
छायाचित्र आर ०७ फोटेावर किरण दराडे