त्र्यंबकेश्वर : शहरातील सन २०११ च्या आतील अतिक्रमित बांधकामे कायम करण्याचे आदेश पालिकेला शासनाने दिले आहेत. त्यामुळे अशा अतिक्रमणावर पालिका कारवाई करू शकत नाही. मंदिर परिसरात कुणाही नगरसेवकाने अतिक्रमण केले नसल्याचे स्पष्टीकरण नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांचेसह नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिले.शहरातील अतिक्रमण मोहिमेबद्दल जनतेत पसरविण्यात जात असलेल्या गैरसमजाबाबत पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी अतिक्रमणाविषयी खुलासे केले. अतिक्रमण हटवताना नगरसेवकांनी कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही. मंदिर परिसरात कुणाही नगरसेवकाचे अतिक्रमण नाही. याचिकाकर्त्यांकडून नागरिकांमध्ये नगरसेवकांविषयी गैरसमज पसरविले जात आहेत.
याचिकाकर्त्याने आत्मदहनाचा इशारा दिल्यानेच पालिकेला ही मोहीम राबवावी लागली. २०१३ मध्येही याचिकाकर्त्याने अतिक्रमणे काढण्याबाबत इशारा दिला होता. त्यावेळी त्यांचे स्वत:चे घरच अतिक्रमण असल्याने पालिकेने त्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांचे ह्याच घराला परवानगी देण्यासाठी मागणी केली जात असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांचेसह नगरसेवक उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांचेसह सर्व नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, अतिक्रमण हटविण्यावरून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.