नाशिक : मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळूमाफियांनी गाड्या पळवून नेल्याच्या घटनेने हादरलेल्या महसूल खात्यात आता मालेगाव तहसीलदार व अपर जिल्हाधिकारी यांच्यात पत्रापत्रीची लढाई सुरू झाली असून, या साºया प्रकरणात तहसीलदाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीदेखील वाळूमाफियांच्या कृत्यात सहभागी झाल्याचा आरोप अपर जिल्हाधिकाºयांनी केला आहे. तर त्याला उत्तर देताना तहसीलदारांनीही अपर जिल्हाधिकाºयांना असलेल्या कायदेशीर ज्ञानाचे वाभाडे काढले आहेत. या पत्रापत्रीमुळे मालेगावच्या महसूल कर्मचाºयांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून १९ मार्च रोजी मध्यरात्री वाळूमाफियांनी दहा वाळूच्या गाड्या पळवून नेल्याची घटना दुसºया दिवशी उघडकीस आली होती. या प्रकरणी प्रारंभी कार्यालयातील शिपायाने छावणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. परंतु त्यांच्या या कृत्यास जिल्हाधिकाºयांनी आक्षेप घेत तहसीलदारांनी तक्रार नोंदवावी अशी तंबी दिल्यानंतर ज्योती देवरे यांनी तक्रार दाखल केली होती. या साºया प्रकरणात महसूल खात्याची इभ्रत चव्हाट्यावर आल्याने त्याची गंभीर दखल घेण्यात आली. वाळूमाफियांनी केलेली हिंमत पाहता त्यांच्या या कृत्यास महसूल अधिकारी व कर्मचाºयांची फूस असण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, त्याच आधारे अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी यासंदर्भात तहसीलदार देवरे यांना पत्र पाठवून जाब विचारला आहे. यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दाखल करताना आरोपींविरुद्ध कठोर कलमे नमूद करणे आवश्यक असतानाही जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आल्याचे दिसत असल्याचे पत्रात म्हटले असून, सदर पळवून नेलेल्या वाहनांबाबत आपण स्वत: काय चौकशी केली? पळवून नेलेल्या वाहनांसाठी तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचाºयांनी सहकार्य केले काय, अशी विचारणा केली आहे. याबाबत स्वत: चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेशही देवरे यांना पत्राद्वारे दिले होते. अपर जिल्हाधिकारी राऊत यांच्या पत्राला तीन दिवसांनी देवरे यांनी उत्तर दिले असून, त्यात म्हटले आहे की, पोलिसांत फिर्याद दाखल करताना जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा केलेला आरोप मला मान्य नाही. तसेच ज्या कलमांचा गुन्ह्यात वापर करायला हवा होता त्या कलमांचा अर्थ वेगळा होत असून, ती कलमे लावणे योग्य ठरणार नाही. आत्तापर्यंत कार्यालयातून घेतलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गाड्या पळवून नेण्याच्या घटनेत कोणी अधिकारी, कर्मचाºयाने मदत केल्याचे निष्पन्न झालेले नाही.असे नमूद करून आपल्या खात्यातील कर्मचारी, अधिकाºयांना क्लिन चीट देऊन टाकली आहे. कोणी मदत केल्याची अधिक माहिती मिळाल्यास आपल्याला कळविण्यात येईल, असेही देवरे यांनी राऊत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. एकूणच वाळूमाफियांनी तहसील कार्यालयाच्या आवाराचे कुलूप तोडून दहा गाड्या पळवून नेल्याच्या विषयावरून महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाºयांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात असून, त्यात पत्रापत्रीचा खेळ रंगल्याने कर्मचाºयांचे मनोरंजन होत आहे.घटनेला पहारेकरी जबाबदार?तहसीलदार ज्योती देवरे यांना अपर जिल्हाधिकाºयांनी वाळूगाड्या पळवून नेल्याप्रकरणी जाब विचारल्यामुळे की काय देवरे यांनी आपल्या पत्रात मालेगाव तहसीलदार कार्यालयातील पहारेकरी हे पद रिक्त असल्याबाबतची जाणीव राऊत यांना करून दिली आहे. पहारेकरी हे पद रिक्त असून, ते भरण्याबाबत आपण तत्काळ कार्यवाही करावी जेणेकरून भविष्यात असे गैरप्रकार घडणार नाहीत, असेही पत्रात नमूद करून ही सारी घटना पहारेकºयाचे पद रिक्त असल्यामुळेच घडल्याचे अप्रत्यक्ष सूचित केले आहे.
तहसीलदार-अपर जिल्हाधिकाऱ्यांमध्ये पत्रापत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:58 AM
नाशिक : मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळूमाफियांनी गाड्या पळवून नेल्याच्या घटनेने हादरलेल्या महसूल खात्यात आता मालेगाव तहसीलदार व अपर जिल्हाधिकारी यांच्यात पत्रापत्रीची लढाई सुरू झाली असून, या साºया प्रकरणात तहसीलदाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीदेखील वाळूमाफियांच्या कृत्यात सहभागी झाल्याचा आरोप अपर जिल्हाधिकाºयांनी केला आहे. तर त्याला उत्तर देताना तहसीलदारांनीही अपर जिल्हाधिकाºयांना असलेल्या कायदेशीर ज्ञानाचे वाभाडे काढले आहेत. या पत्रापत्रीमुळे मालेगावच्या महसूल कर्मचाºयांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.
ठळक मुद्देवाळूगाड्या प्रकरणएकमेकांवर दोषारोपाची चढाई